शिरोळ तालुक्यातील घोसरवाडमध्ये होममिनीस्टर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
शिरोळ तालुक्यातील घोसरवाडमध्ये होममिनीस्टर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
घोसरवाड/प्रतिनिधीसुनिल नाईक/ सिध्दरेखा फौंडेशन व श्रीराम ज्वेलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने होममिनीस्टर कार्यक्रम व महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी सौ.चारुशिला सागर नाईक या मानाची पैठणी व होममिनीस्टरच्या मानकरी ठरल्या. यावेळी सौ. उत्तरादेवी शिंदे, सौ. गीता खोत व ग्रा.पं. सदस्या प्रमुख उपस्थित होत्या. सिध्देश्वर मंदिर येथे झालेल्या याकार्यक्रमप्रसंगी प्रा. सौ. श्वेता चौगुले यांचे महिला स्वावलंबन, सबलीकरण व सक्षमीकरण या विषयावर व्याख्यान झाले. मदन पलंगे यांनी होममिनीस्टरचा कार्यक्रम चागल्या पध्दतीने संपन्न केला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते महिलांना गृहोपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या. या कार्यक्रमास महिला, युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा