तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, आ.शहाजीबापूंची ग्वाही

 तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, आ.शहाजीबापूंची ग्वाही




अकोला ग्रामस्थांच्या वतीने श्री सिद्धनाथ मंदिरांत आ.शहाजीबापूंचा सत्कार संपन्न



सांगोला (तालुका प्रतिनिधी): राज्यातील तीर्थक्षेत्राना सर्वाधिक निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने अकोला येथील श्री सिद्धनाथ मंदिरांच्या विकासासाठी २ कोटी, जवळा येथील श्री नारायणदेव मंदिराच्या विकासासाठी १ कोटी २४ लाख रु. तर कडलास येथील श्री सोमनाथ मंदिराच्या विकासासाठी १ कोटी १५ लाख रु. असा एकूण ४ कोटी ३९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. भविष्यातही विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही आमदार शहाजीबापू पाटील यांनी कार्यक्रमाप्रसंगी अकोला (वा) ता. सांगोला येथे बोलताना दिली.

        सांगोला तालुक्यातील जवळा, कडलास आणि अकोला येथील तीर्थक्षेत्राच्या विकास कामांसाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी निधी उपलब्ध करून दिला. यानिमित्ताने अकोला ग्रामस्थांच्या वतीने आमदार शहाजीबापू पाटील यांचा श्री सिद्धनाथ मंदिरांत सत्कार करण्यात आला. आमदार शहाजीबापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने अकोला येथील श्री सिद्धनाथ मंदिरांच्या विकासासाठी २ कोटी, जवळा येथील श्री नारायणदेव मंदिराच्या विकासासाठी १ कोटी २४ लाख रु. तर कडलास येथील श्री सोमनाथ मंदिराच्या विकासासाठी १ कोटी १५ लाख रु. असा एकूण ४ कोटी ३९ लाख रुपयांचा घसघशीत निधी मंजूर झाला आहे.

       यावेळी बोलताना आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर तालुक्याच्या विकासाचे प्रश्न झपाट्याने सुटत आहे. जवळा, कडलास आणि अकोला येथील तीर्थक्षेत्राच्या कामांसाठी भरीव निधी देवून विकास कामाला गती दिली आहे. तीर्थक्षेत्राच्या कामांसाठी निधीची कमतरता जाणवणार नाही. भविष्यात देखील तीर्थक्षेत्राच्या कामांसाठी निधीची तरतूद केली जाईल अशी ग्वाही आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकभाऊ शिंदे, भानुदास खटकाळे, बाळासाहेब आसबे, अनिल खटकाळे, समाधान खटकाळे, साहेबराव भालके, महादेव शिंदे, अमोल लिगाडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंडगरवाडी येथिल बंधाऱ्यामध्ये अनोळखी पुरुष जातीचे मयत सापडले

जिल्ह्यातील गट सचिवांना दीपावलीला तीन महिन्याचा पगार बोनस म्हणून द्यावा.

गोरगरीब जनतेसाठी सर्वतोपरी मदतीसाठी धाऊन जाणारा एखतपुर गावचा अवलिया पै.पंकज (Boss) चव्हाण