दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीच्या सांगोला पोलीसांनी आवळल्या मुसक्या!
दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या
टोळीच्या सांगोला पोलीसांनी आवळल्या मुसक्या!
- ढाळेवाडी कॅनॉल, महुद, ता सांगोला जि सोलापुर येथे काही इसम बोलेरो गाडीने दरोडा टकाण्याच्या तयारीने येणार आहेत अशी गोपनीय बातमी मिळताच सांगोला पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक भिमराव खणदाळे यांनी तात्काळ खात्री करुन कायदेशिर कारवाई करणेबाबत आदेश दिले होते . त्याप्रमाणे सांगोला पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे, सहायक पोलीस निरीक्षक खरात, पोलीस हेड कॉन्स्टेबल तुकाराम व्हरे, पोलीस नाईक बबलु पाटील, पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण वाघमोडे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल कुंभार असे खाजगी वाहनाने सदर ठिकाणी रवाना झाले, याठिकाणी जावुन सापळा लावला असता एक महिंन्द्रा कंपनीची बोलेरो गाडी तिचा नंबर एम एच ४५ डी ०३३३ या गाडीने काही इसम ढाळे वाडी कॅनॉल येथून जात असताना पोलीसांनी सदर बोलेरो गाडीस पोलीसांची गाडी आडवी लावुन अडविले, सदरची गाडी अडविल्यामुळे गाडीतील पाच व्यक्ती खाली उतरुन पळुन जावु लागल्या, त्यावेळी तात्काळ पोलीस पथकाने सदर पाच पैकी तीन आरोपींना रंगेहात पकडले, व दोन जण पळून गेले, सदर आरोपींची व बोलेरो गाडीची झडती घेतली असता त्यांचेकडे कटावणी, स्क्रु ड्रायव्हर, वायर, लाल तिखट, काठया, पाना तसेच दोन मोबाईल व दरोडा टाकण्याच्या तयारी करीता लागणारे साहीत्य मिळुन आले, पोलीस पथकाने सदर आरोपीना नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे १) अमोल भानुदास चव्हाण वय २६ वर्षे, २) कुणाल परशुराम काळे वय १९ वर्षे, दोघे रा सवतगाव, ता माळशिरस जि सोलापुर ३) रवि आनंदराव चव्हाण वय ३० वर्षे रा हरीनगर अकलुज असे सांगीतले, तसेच पळुन गेलेल्या आरोपींची नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे १) सनि भानुदास चव्हाण वय ३५ वर्षे, २) परशुराम देविदास चव्हाण वय ३५ वर्षे रा सवतगाव ता माळशिरस अशी नावे सांगीतली, त्यांच्याविरुदध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क २२९/२४ भादविक ३९९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सांगोला पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे हे करीत आहेत.
पकडण्यात आलेले आरोपी १) अमोल भानुदास चव्हाण वय २६ वर्षे, २) कुणाल परशुराम काळे वय १९ वर्षे, दोघे रा सवतगाव, ता माळशिरस जि सोलापुर ३) रवि आनंदराव चव्हाण वय ३० वर्षे रा हरीनगर अकलुज यांना वरील गुन्हयामध्ये अटक करण्यात आली आहे. सदर आरोपींना मा न्यायालयात हजर करुन गुन्हयाचा पुढील तपास करण्यात येत आहे.
सदरचे आरोपी हे सांगोला पोलीस ठाणे व इतर पोलीस ठाणेकडील जनावरे चोरीबाबच्या अनेक गुन्हयामध्ये वरील हे आरोपी पाहीजे होते,यांच्याकडुन अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदरची ही कामगिरी मा पोलीस अधीक्षक साो श्री शिरीष सरदेशंपाडे, मा अपर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर, मा उप विभागीय पोलीस अधिकारी श्री विक्रांत गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली सांगोला
पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री भिमराव खणदाळे यांचे नेतृत्वाखाली सांगोला पोलीस ठाणकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आदिनाथ खरात, पोलीस हेड कॉन्स्टेबल तुकाराम व्हरे, पोलीस नाईक बबलु पाटील, पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण वाघमोडे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल कुंभार, पोलीस कॉन्स्टेबल युसुफ पठाण यांनी बजावली आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा