हिंदू जनजागृती समितीच्या प्रबोधनाचा सकारात्मक परिणाम सांगोला येथे परीट गल्लीतील नव महाराष्ट्र संघ गणेश मंडळ यांनी साजरी केली आदर्श होळी

 हिंदू जनजागृती समितीच्या प्रबोधनाचा सकारात्मक परिणाम सांगोला येथे परीट गल्लीतील नव महाराष्ट्र संघ गणेश मंडळ यांनी साजरी केली आदर्श होळी 



सांगोला -  हिंदू जनजागृती समितीच्या वतीने डेबुजी चौक, परिट गल्ली येथील नव महाराष्ट्र संघ गणेश मंडळातील मुलांना आदर्श होळी साजरी करण्याविषयी प्रबोधन करण्यात आले होते त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून या मुलांनी उत्साहाने व शास्त्रोक्त पद्धतीने आदर्श होळी साजरी केली. हिंदू जनजागृती समितीच्या वतीने सौ. शुभांगी पाटणे व श्री. संतोष पाटणे यांनी दोन दिवसापूर्वी या मंडळातील मुलांची बैठक घेऊ


न आपण आदर्श होळी कशी साजरी करू शकतो, त्यासोबत यातील होणारे गैरप्रकार व त्याचे परिणाम याविषयी मार्गदर्शन केले होते. त्यानंतर या मुलांनी या मार्गदर्शनास सकारात्मक प्रतिसाद देत व कशा पद्धतीने साजरी करायला हवी हे जाणून घेऊन त्या पद्धतीने म्हणजेच शास्त्रोक्त पद्धतीने आदर्श होळी साजरी केली व त्यासोबतच त्यातील होणारे गैरप्रकार टाळले आपल्या हिंदू धर्मातील सण व उत्सव आदर्श साजरे केले जावेत तसेच त्यातील गैरप्रकार टाळले जावेत या उदात्त हेतूने व तळमळीने हिंदू जनजागृती समितीच्या कार्यात सहभागी असणारे परिट गल्ली येथील सौ. नेहा कावळे व श्री. नवनाथ कावळे यांनी पुढाकार घेतला. गल्लीतील मुलांनीही या उपक्रमास उस्फूर्त प्रतिसाद दिला सोबतच धर्मशिक्षणाच्या अभावामुळे व चुकीच्या प्रथा रूढ झाल्याने उत्सवाचे विद्रुपीकरण कसे झाले आहे. हे समजल्यानंतर ते टाळण्याचाही मंडळातील मुलांनी आवर्जून प्रयत्न केला.  होळी हा एक यज्ञच आहे हे लक्षात घेवून मुलांनी ज्वलनासाठी त्यात कचरा, प्लास्टिक, टायर टाकणे टाळले  तसेच होळी भोवती रांगोळी काढून, नैवेद्य दाखवून होलिका देवीची पूजा केली. तसेच दुसऱ्या दिवशी येणाऱ्या जाणाऱ्या दूधवाल्यांकडून अडवून दूध घेणे, रस्ता अडवणे, दूध दिले नाही तर राड टाकणे अशी चुकीची प्रथा रूढ झाली होती, त्यामुळे उत्सवाचे पावित्र्य नष्ट होवू शकते व इतरांना त्रास होवू शकतो याचे प्रबोधन केल्यामुळे मुलांनीही ती चुकीची प्रथा बंद केली. यासाठी मुलांना श्री. नवनाथ कावळे यांनी स्वतः दूध उपलब्ध करून  दिले. यामुळे या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यासाठी तरुण मंडळाचा उत्सव अध्यक्ष वेदांत सचिन पाटोळे यानेही पुढाकार घेवून प्रयत्न केले. या वेळी गल्लीतील संदीप पाटोळे, गणेश पाटोळे,  रणजित स्वामी,  काशिनाथ साळुंखे, समर्थ संतोष ढोले, विनायक पाटोळे, सूरज पाटोळे, शिवराज कावळे, विराज ढोले यांसह गल्लीतील  अनेक जण यावेळी उपस्थित होते.

 

*चौकट* - उत्सव साजरा करताना त्यापाठीमागील शास्त्र जाणून घेतल्याने अनवधानाने होणारे गैर प्रकार रोखले जाऊन खऱ्या अर्थाने त्यातील आनंद घेण्यास मिळाला अशाच पद्धतीने पुढील उत्सव आदर्श पद्धतीने साजरे करण्यासाठी प्रयत्न करू. हिंदू जनजागृती समितीच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला. - गणेश पाटोळे, माजी अध्यक्ष

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंडगरवाडी येथिल बंधाऱ्यामध्ये अनोळखी पुरुष जातीचे मयत सापडले

जिल्ह्यातील गट सचिवांना दीपावलीला तीन महिन्याचा पगार बोनस म्हणून द्यावा.

गोरगरीब जनतेसाठी सर्वतोपरी मदतीसाठी धाऊन जाणारा एखतपुर गावचा अवलिया पै.पंकज (Boss) चव्हाण