म्हैसाळ प्रकल्पाच्या सांगोला तालुक्यातील वंचित गावांसाठी सुधारित कामांच्या ९९ कोटी ३ लाखांच्या निविदा प्रसिद्ध होणार - आ.शहाजीबापू पाटील.

 म्हैसाळ प्रकल्पाच्या सांगोला तालुक्यातील वंचित गावांसाठी सुधारित कामांच्या ९९ कोटी ३ लाखांच्या निविदा प्रसिद्ध होणार - आ.शहाजीबापू पाटील.




लाभक्षेत्रातील शेतीच्या, पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार



सांगोला (तालुका प्रतिनिधी): म्हैसाळ योजनेत सांगोला तालुक्यातील वंचित गावांचा सर्वसाधारण आराखडा, संकल्पन, अंदाजपत्रके व प्रारूप निविदा अंतिम झाली आहेत. या योजनेचा विशेष बाब म्हणून समावेश करण्यासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी शासनस्तरावर अथक प्रयत्न करून पाठपुरावा केला आहे. सदर कामांच्या पाठपुराव्याला यश आले असून म्हैसाळ योजनेच्या सुधारित कामांसाठी 49 कोटी 45 लाख रुपये व 49 कोटी 58 लाख रुपये अशा ९९ कोटी ३ लाख रुपयांच्या दोन निविदा लवकरच प्रसिध्द होणार असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.

       म्हैसाळ प्रकल्पाच्या पाचव्या मंजुर सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार ६ टी.एम.सी. पाणी मंजूर आहे. सदरील मंजूर पाणी वापरापैकी १ टी.एम.सी. पाण्याचा वापर लाभक्षेत्रातील तलाव व बंधारे भरण्यासाठी राखीव आहे. या राखीव पाण्यातून सांगोला तालुक्यातील वंचित गावांतील वाणीचिंचाळे, वाकीघेरडी, जवळा, भोपसेवाडी, तरंगेवाडी, आगलावेवाडी, आलेगांव, मेडशिंगी, पारे, सोनंद, घेरडी मधील पाझर तलाव, गाव तलाव, बंधारे भरुन देण्यात येणार आहेत. तसेच पारे व जवळा येथील लघु पाटबंधारे तलाव, लाभक्षेत्रातील घेरडी तलाव, नराळे तलाव, हंगीरगे तलाव बंदिस्त नलिकांव्दारे भरुन देण्याच्या कामाचा समावेश पाचव्या सुधारित प्रशासकीय मान्यतामध्ये करण्यात आला आहे.

      कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक आणि आमदार शहाजीबापू पाटील यांच्या समवेत झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने सांगोला तालुक्यातील तलाव, बंधारे, लघु पाटबंधारे तलाव म्हैसाळ योजनेतून भरुन देण्याची मागणी केली होती. त्यानुसार सदर कामाचे सर्वेक्षण, संकल्पन व अंदाजपत्रक तयार करणे, कामाचा सन 2023-24 च्या पुरवणी प्रापणसूची समावेश करुन त्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांच्या अध्यक्षतेखाली खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार शहाजीबापू पाटील यांच्या समवेत झालेल्या बैठकीत सांगोला तालुक्यातील वंचित गावांचा सर्वसाधारण आराखडा, संकल्पन, अंदाजपत्रके तयार करून निविदा तातडीने प्रसिद्ध करण्याच्या सूचना बैठकीमध्ये देण्यात आल्या होत्य. त्या अनुषंगाने म्हैसाळ योजनेच्या सुधारित कामांसाठी 49 कोटी 45 लाख रुपये व 49 कोटी 58 लाख रुपये अशा ९९ कोटी ३ लाख रुपयांच्या दोन निविदा लवकरच प्रसिध्द होणार आहेत. सदरची कामे पूर्ण झाल्यानंतर सांगोला  तालुक्यातील वंचित गावांमधील पाझर तलाव, गाव तलाव, बंधारे भविष्यातील टंचाईकाळात भरून देणे शक्य होणार असून या भागातील शेतीच्या, पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंडगरवाडी येथिल बंधाऱ्यामध्ये अनोळखी पुरुष जातीचे मयत सापडले

जिल्ह्यातील गट सचिवांना दीपावलीला तीन महिन्याचा पगार बोनस म्हणून द्यावा.

गोरगरीब जनतेसाठी सर्वतोपरी मदतीसाठी धाऊन जाणारा एखतपुर गावचा अवलिया पै.पंकज (Boss) चव्हाण