करमाळा तालुक्यातील बोट आपघातग्रस्त दुर्घटनेतील मयत व्यक्तींच्या कुटुंबियांचे धैर्यशील मोहिते-पाटील यांनी सांत्वन केले
करमाळा तालुक्यातील बोट आपघातग्रस्त दुर्घटनेतील मयत व्यक्तींच्या कुटुंबियांचे धैर्यशील मोहिते-पाटील यांनी सांत्वन केले
.jpg)
उजनी धरण भीमा नदी पात्रात मंगळवारी सायंकाळच्या दरम्यान कुगाव (ता. करमाळा) येथून कळाशी (ता. इंदापूर) येथे जात असलेली बोट वादळी वाऱ्यामुळे हेलकावे खात पलटी झाली. या दुर्घटनेत करमाळा तालुक्यातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मृतांमध्ये कुगाव येथील आदिनथचे माजी चेअरमन धनंजय डोंगरे यांचे चिरंजीव गौरव डोंगरे, बोट चालक अनुराघ अवघडे व झरे येथील जाधव दांपत्य व त्यांच्या दोन लहान मुलांचा समावेश आहे. यांच्या अंतिम संस्काराच्या प्रसंगी धैर्यशील मोहिते पाटील यांनी उपस्थित राहून मृतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली व शोकाकुल कुटुंबियांचे सांत्वन केले.
यावेळेस मोहिते पाटील यांनी उजनी धरणातील प्रवासी वाहतुकी संदर्भात धोरण बनवावे व वाहतूक करणाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देण्यात यावे जेणेकरून भविष्यातील मोठे अपघात टाळता येतील तसेच मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना शासनाकडून योग्य ती मदत मिळावी असे धैर्यशिल मोहिते-पाटील यांनी पत्रकारांच्या समवेत बोलताना शासनाकडे मागणी केली.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा