ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित वालचंद विद्यालय व जुनियर कॉलेज कळंब येथे काल दिनांक 26 जून 2024 रोजी, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली

ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित वालचंद विद्यालय व जुनियर कॉलेज कळंब येथे काल दिनांक 26 जून 2024 रोजी, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली





ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित वालचंद विद्यालय व जुनियर कॉलेज कळंब येथे काल दिनांक 26 जून 2024 रोजी, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वालचंद विद्यालय कॉलेजचे प्राचार्य, सर्वगोड सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष रुपनवर एमडी, जूनियर विभाग प्रमुख सावंत सर, ज्येष्ठ शिक्षक अर्जुन सर उपस्थित सर्व शिक्षक व सर्व विद्यार्थी उपस्थित होते,







 छत्रपती शाहू महाराजांनी समाजामध्ये केलेल्या कार्याचा उल्लेख, त्यामध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी समाजासाठी आपल्या 48 वर्षाच्या हयातीमधील सर्व वेळ हा समाजाच्या हितासाठी खर्च केला, दीनदलित,अस्पृश्य समाजाच्या, समस्या सोडवण्यासाठी, कोल्हापूर संस्थानांमधील केलेले अमुलाग्र बदल यामध्ये प्रामुख्याने राधानगरी धरण असेल, कुस्तीमध्ये प्रामुख्याने असलेली कोल्हापूरची ओळख, अशा छत्रपती शाहू महाराजांच्या विविध कार्याचा उजाळा आज कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विद्यालयाचे प्राचार्य सर्वगोड सर यांनी मांडला,

 यावेळी अनेक विद्यार्थ्यांची मनोगत देखील झाली, 

 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख गायकवाड मॅडम यांनी केले, कार्यक्रमाचे प्रस्ताविक हे हिप्परकर मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन पोळ सर यांनी केले..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंडगरवाडी येथिल बंधाऱ्यामध्ये अनोळखी पुरुष जातीचे मयत सापडले

जिल्ह्यातील गट सचिवांना दीपावलीला तीन महिन्याचा पगार बोनस म्हणून द्यावा.

गोरगरीब जनतेसाठी सर्वतोपरी मदतीसाठी धाऊन जाणारा एखतपुर गावचा अवलिया पै.पंकज (Boss) चव्हाण