वाढदिवसदिनी गुंडादादा खटकाळे मित्र परिवारांचा रक्तदानाचा संकल्प


 वाढदिवसदिनी गुंडादादा खटकाळे मित्र परिवारांचा रक्तदानाचा संकल्प 



सांगोला (तालुका प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापक पातळीवर गरजू रुग्णांना तात्काळ रक्ताचा पुरवठा उपलब्ध होण्यासाठी युवासेनेचे तालुकाप्रमुख दिपक उर्फ गुंडादादा खटकाळे यांचा वाढदिवस वाढदिवस रक्तदान संकल्प दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय गुंडादादा खटकाळे मित्र परिवाराने घेतला आहे.

       १५ जून रोजी युवा सेनेचे तालुकाप्रमुख दिपक उर्फ गुंडादादा खटकाळे यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासत सदानंद मल्टीपर्पज हॉल, मिरज रोड, सांगोला येथे सकाळी १० वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा पुष्पगुच्छ, हार-तुरे, केक, भेटवस्तू किंवा होर्डिंगच्या माध्यमातून देण्याऐवजी रक्तदान करून शुभेच्छा द्याव्यात. वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी जपत माझ्या वाढदिवसानिमित्त सर्वांनी रक्तदानाचा संकल्प करावा. असे आवाहन युवासेनेचे तालुकाप्रमुख दिपक (गुंडादादा) खटकाळे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंडगरवाडी येथिल बंधाऱ्यामध्ये अनोळखी पुरुष जातीचे मयत सापडले

जिल्ह्यातील गट सचिवांना दीपावलीला तीन महिन्याचा पगार बोनस म्हणून द्यावा.

गोरगरीब जनतेसाठी सर्वतोपरी मदतीसाठी धाऊन जाणारा एखतपुर गावचा अवलिया पै.पंकज (Boss) चव्हाण