ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित वालचंद विद्यालय व जुनिअर कॉलेज कळंब येथे २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

 ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित वालचंद विद्यालय व जुनिअर कॉलेज कळंब येथे २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 







त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रपती पदक विजेते योगशिक्षक श्री शंकर कवळे सर व क्रीडा शिक्षक श्री काळे सर यांनी यांनी खूप छान व अचूक योगासने, प्राणायामे, करून दाखवली व त्यांच्या समवेत मुलांनी देखील छान प्रकारे योगासने , प्रणायमे केली. त्यावेळी आजच्या धावपळीच्या युगामध्ये योगासने व त्यांचे किती महत्त्व आहे ते विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. त्यावेळी सर्व विद्यार्थी व शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील उत्तमरीत्या योगासने केली. सूर्यनमस्कार , कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रमरी, बसरका, अशी विविध प्रणायमे व योगासनाचा समावेश होता. ओम साधना, हास्यासन , व भजन कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. सर्वांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद देऊन आनंद द्विगुणित केला. सर्व विद्यार्थ्यांनी शारीरिक व मानसिक दृष्ट्या बलवान असले पाहिजे, व दररोज व्यायाम केला पाहिजे व मनाला नियमित आनंदी व प्रसन्न ठेवलं पाहिजे सकारात्मक विचार करून आत्मविश्वास वाढवला पाहिजे असे मत विद्यालयाचे प्राचार्य सर्वगोड सर सर यांनी व्यक्त केले. अशा प्रकारचे कार्यक्रम अतिशय स्तुत्य प्रिय आहेत विद्यार्थ्यांसाठी खूप हितचे आहेत, अशा प्रकारच्या विविध कार्यक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो असे मत संस्थेचे अध्यक्ष मा. रामचंद्र कदम यांनी व्यक्त केले. संस्था पदाधिकाऱ्यांनी सर्वांचे कौतुक केले. विद्यालयाचे पर्यवेक्षक गलांडे सर व कनिष्ठ महाविद्यालयातील जुनिअर विभाग प्रमुख शिक्षिका सावंत सर, जेष्ठ शिक्षक अर्जुन सर यांनी उपस्थित मान्यवरांना शाल श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंडगरवाडी येथिल बंधाऱ्यामध्ये अनोळखी पुरुष जातीचे मयत सापडले

जिल्ह्यातील गट सचिवांना दीपावलीला तीन महिन्याचा पगार बोनस म्हणून द्यावा.

गोरगरीब जनतेसाठी सर्वतोपरी मदतीसाठी धाऊन जाणारा एखतपुर गावचा अवलिया पै.पंकज (Boss) चव्हाण