कृषीदूतांनी शेतकऱ्यांना केले 'ई पीक पाहणी' बद्दल मार्गदर्शन.
कृषीदूतांनी शेतकऱ्यांना केले 'ई पीक पाहणी' बद्दल मार्गदर्शन.
निमसाखर, दि. २६ निमसाखर, ता. इंदापूर येथे बारामती येथील डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयाच्या कृषीदुतांनी ई पीक पाहणी कशी करावी व आपली पीके कशी नोंदवावी याबद्दल शेतकऱ्यांना माहिती दिली.
आतापर्यंत शेतकऱ्यांच्या पिक पेऱ्याची नोंद ही तलाठी यांच्यामार्फत केली जात होती. प्रत्यक्ष गटात न जाता शेतकरी ज्या पिकाची नावे सांगेल त्याच पिकाचा पेरा झाला असे ग्राह्य धरुण त्याची नोंद होत असत. त्यामुळे नुकसानभरपाईच्या दरम्यान अनेक अडचणींचा सामना आधिकारी यांना करावा लागत होता. अनेक शेतकऱ्यांच्या पिकाच्या नोंदी नसतानाही शासकीय मदत लाटली जात होती. शेतकऱ्याने पेरलेल्या पिकाची अचू्क नोंद शासन दप्तरी व्हावी आणि शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा व्हावा या दृष्टीने ‘ई-पीक पाहणी’ अॅप निर्माण करण्यात आले आहे. यामाध्यमातून शेतकऱ्याने कोणत्या गटामध्ये कोणते पिक घेतले आहे याची नोंद तर होणारच आहे शिवाय ते ठिकाणही अक्षांश / रेखांशमध्ये नोंद केले जाणार आहे. याबद्दल महिती दिली गेली.
•ई पीक पाहणीचे फायदे काय?
ई-पीक पाहणी करताना दिलेली माहिती 4 प्रकारचे लाभ देण्यासाठी वापरली जात असल्याचं कृषीदुतांनी सांगितलं.
•MSP मिळवण्यासाठी – तुम्हाला जर तुमचा शेतमाल किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विक्री करायचा असेल तर त्यासाठीही तुमच्या संमतीनं हा डेटा वापरला जाऊ शकतो.
•पीक कर्जाच्या पडताळणीसाठी - तुम्ही ज्या पिकावर कर्ज घेतलंय, तेच पिक लावलं का, याची बँक हा डेटा पाहून पडताळणी करू शकते. 100 च्या वर बँका आजघडीला हा डेटा वापरत आहेत.
•पीक विमा योजनेच्या लाभासाठी – विम्यासाठी अर्ज करताना नोंदवलेलं पीक आणि ई-पीक पाहणीत नोंदवलेलं पीक, यात तफावत आढळल्यास पीक पाहणीतील पीक अंतिम गृहित धरलं जातं.
•नुकसान भरपाईसाठी - नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचं नुकसान झाल्यास भरपाई देण्यासाठी.
सदर प्रात्याक्षिकास शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी सुधाकर भिलारे ,कृषी सहायक श्रद्धा घोडके , राजेंद्र पवार, तनुजा पवार, सतीश सुळ, विजय काळे ,तुकाराम माने, शिवाजी बर्गे व इतर शेतकरी उपस्थित होते. कृषीदुत योगेश घोडे, ऋषिकेश बनसोडे, शंतनु गावंडे, प्रथम बिरादार, चैतन्य भोसले, अनंत हरक, ओमकार भिलारे, नितांत भोसले हे डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. पी. गायकवाड, प्रा. एस. व्ही. बुरुंगले यांच्या व इतर प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा