योगदिनानिमित्त लोकनेते शहाजीराव पाटील विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतले योग प्रशिक्षणाचे धडे.
योग दिनानिमित्त लोकनेते शहाजीराव पाटील विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतले योग प्रशिक्षणाचे धडे.
संपूर्ण विश्वामध्ये सध्याच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक युगामध्ये वृद्धी ,विकास,आणि शांती च्या प्रचारासाठी,वैश्विक बंधुभाव वाढवण्यासाठी योगाभ्यास आवश्यक आहे. रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी व निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली म्हणून योगाला आपल्या आयुष्यात महत्वाचे स्थान आहे. योगा केल्याने शरीरावर सकारात्मक परिणाम होतो. शरीर आणि मन शांत करण्यासाठी, शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी, स्नायूंची ताकद वाढविण्यासाठी तसेच श्वसन, ऊर्जा आणि चैतन्य सुधारण्यासाठी योगा अत्यावश्यक आहे असे विचार श्री.अमर निलाखे सर यांनी प्रास्ताविकात व्यक्त केले.
योग करेगा भारत, स्वस्थ रहेगा भारत"* योगा चे जनक महर्षी पतंजली यांच्या कडून मिळालेल्या हा अनमोल ठेवा जपून योग साधना केली पाहिजे.शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपल्या देशात व जगाभारात योगसाधनेला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. गेल्या कित्येक दशकांपासून भारताची ओळख असलेला योगाभ्यास आता *“आंतरराष्ट्रीय योग दिवस” या औचित्याने जगभरात अधिकृत रित्या मान्यताप्राप्त झाला आहे. या युगात उत्तम आरोग्यासाठी योगा ,प्राणायाम आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच शारीरिक विकास होणे आवश्यक आहे. यासाठी लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक विद्यालय बोराटवाडी मध्ये आंतरराष्ट्रीय योगगुरू श्री.ऋतेश कवळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना योगास व प्राणायाम यांचे धडे अभ्यासून प्रात्यक्षिक करून दाखविले.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री.भिमराव आवारे सर,क्रिडा शिक्षक श्री.सदाशिव सावंत सर शिक्षक वृंद उपस्थित होते.* त्यांनी ही विद्यार्थ्यांसमवेत योग प्राणायाम यांचा आनंद घेतला.
*कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री.अमर निलाखे सर यांनी केले.*
🤸🏻♂️ 🧘🏻♀️ 🧘🏻♂️ 🧘🏻♀️🧘🏻♂️🧎🏻♀️🧎🏻🤸🏻♀️



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा