पोलीस शिपाई 25 हजाराची लाच घेताना अँटी करप्शनच्या जाळ्यात.
पोलीस शिपाई 25 हजाराची लाच घेताना अँटी करप्शनच्या जाळ्यात.
सांगोला प्रतिनिधी ; तक्रारदार आणि त्याच्या मुलाविरुद्ध सांगोला पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात कलम वाढ तसेच अटक न करता जामिनावर सोडणे व गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी ४५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
तडजोडीअंती पोलिस कॉन्स्टेबलने खासगी इसमामार्फत २५ हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून दोघांना पकडले.
ही कारवाई सोमवार, दि.२२ जुलै रोजी दुपारी दीडच्या सुमारास सांगोला शहरातील वासूद चौक येथील एका फोटो स्टुडिओमध्ये घडली.
पोलिस कॉन्स्टेबल सोमनाथ बबन माने (नेमणूक सांगोला पोलिस ठाणे) व खासगी इसम अक्षय दत्तात्रय पवार (रा. वाटंबरे ता. सांगोला) यांच्याविरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत तक्रारदार व त्याच्या मुलाविरुद्ध सांगोला पोलिस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात कलम वाढ करत नाही.
तसेच अटक न करता जामिनावर सोडण्यासाठी व गुन्ह्याच्या तपासामध्ये मदत करण्यासाठी सोमनाथ माने यांनी खासगी इसमामार्फत तक्रारदार यांच्याकडे ४५ हजार रुपये लाचेची मागणी केल्याबाबत तक्रार लाचलुचपत विभाग सोलापूर यांच्याकडे प्राप्त झाली होती.
सोमवार, २२ जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून तक्रारीची पडताळणी केली असता प्रथम ३० हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती पोलिस कॉन्स्टेबल सोमनाथ माने यांनी स्वीकारण्याची तयारी दर्शवून खासगी इसम अक्षय दत्तात्रय पवार यांच्या हस्ते २५ हजार रुपये लाच स्वीकारताना सापळा रचून पकडले.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर पोलिस उपअधीक्षक गणेश कुंभार, सहायक पोलिस फौजदार कोळी, पोलिस हवालदार सोनवणे, पोलिस कॉन्स्टेबल किणगी चालक, पोलीस हवालदार गायकवाड यांच्या पथकाने केली.
🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा