महूद येथील पिढीत कांबळे कुटुंबाची सांत्वनपर भेट व पंचवीस हजार रोख आर्थिक मदत

 महूद येथील पिढीत कांबळे कुटुंबाची सांत्वनपर भेट व पंचवीस हजार रोख आर्थिक मदत



तालुक्यातील आंबेडकरी समाजाने कांबळे कुटुंबास आर्थिक मदत करावी :- सुरजदादा बनसोडे



सांगोला (दैनिक सांगोला चौफेर) महूद येथील सुनील कांबळे या मातंग समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांची क्षुल्लक कारणावरून निर्घृण हत्या भरचौकात करण्यात आली होती , त्या गावाला व पीडित कुटुंबाची भेट व सांत्वन करणे व त्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी प्रत्येक आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी प्रयत्न केला पाहिजे म्हणून त्या कुटुंबाचे सांत्वन व आर्थिक मदत म्हणून रिपब्लिकन पँथर ऑफ इंडिया चे संस्थापक अध्यक्ष व नगरसेवक सुरज दादा बनसोडे यांच्या वतीने 25000 ( पंचवीस हजार ) रुपये रोख स्वरूपात आर्थिक मदत करण्यात आली .

           महूद येथे मातंग समाजातील समाज मंदिरातील आण्णा भाऊ साठे व सुनील कांबळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. पुढे आपल्या श्रद्धांजली व सांत्वन मनोगतात सुरजदादा म्हणाले की सुनील कांबळेच्या हत्येचे कोणीही राजकारण करू नये. त्या कुटुंबास न्याय मिळवून देणे हेच उद्दिष्ट आंबेडकरी चळवळीतील प्रत्येक नेते यांनी डोळ्या समोर ठेवून काम करावे .मोर्चे , निवेदन ही आंदोलने पण जरूर करावीत आणि ती केलीच पाहिजेत. आंबेडकरी चळवळीत काम करत असताना त्या कुटुंबाच्या भविष्यातील उदरनिर्वाहा साठी पण काहीतरी मदत करणे गरजेचे आहे , म्हणून त्या कुटुंबाला माझ्या वतीने तूटपुंजी मदत म्हणून (25000) पंचवीस हजार रुपये रोख स्वरूपात मदत करून सुरुवात केली.जेणेकरून आंबेडकरी चळवळीतील नेते तसेच दलित प्रवर्गातील मातंग , व होलार समाजाचे नेते व पदाधिकारी आपल्या कुवती प्रमाणे आर्थिक मदत करतील असे अपेक्षित होते. ज्या समाजाचे आपण प्रतिनिधित्व करतो असे दाखवून राजकारणात, समाजकारणात पद प्रतिष्ठा मिळवतो त्या समाजाचं काहितरी देणं म्हणून अशा पीडित कुटुंबाला भविष्यात उदरनिर्वाहासाठी आपण इतर आधारा बरोबर आर्थिक आधार देणे महत्वाचे असते.नाहीतर जमलेल्या भावनिक समूहापुढे भडकावू भाषणे करणे आणि निघून जाणे योग्य नाही. म्हणून तालुक्यातील आंबेडकरी समाजाने त्या कुटुंबाला कायदेशीर न्याय मिळवून देण्याबरोबर आर्थिक मदत करणे गरजेचे आहे. म्हणून तालुक्यातील प्रत्येक गावातून आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या दलित वस्ती आंबेडकरी समाजातील कुवती प्रमाणे वर्गणी जमा करून सुनील कांबळे यांच्या कुटुंबाला मदत करावी. सुनील कांबळे यांच्या कुटुंबात पत्नी व लहान एक मुलगा व एक मुलगी आहे जेणे करून त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व मुलांच्या शिक्षणास मदत होईल,असे आवाहन नगरसेवक व रिपब्लिकन पँथर ऑफ इंडिया चे संस्थापक अध्यक्ष सुरजदादा बनसोडे यांनी केले.

  यावेळी अभिषेक कांबळे , संपादक जगन्नाथ साठे,लकी कांबळे , चंद्रकांत काटे , प्रवीण वाघमारे , देवराज बनसोडे , 

 दिपक होवाळ,सचिन होवाळ,समाधान (बापू )होवाळ,

अविनाश जगधने व खलिफा सर तसेच महूद गावातील आंबेडकरी समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंडगरवाडी येथिल बंधाऱ्यामध्ये अनोळखी पुरुष जातीचे मयत सापडले

जिल्ह्यातील गट सचिवांना दीपावलीला तीन महिन्याचा पगार बोनस म्हणून द्यावा.

गोरगरीब जनतेसाठी सर्वतोपरी मदतीसाठी धाऊन जाणारा एखतपुर गावचा अवलिया पै.पंकज (Boss) चव्हाण