रेशनकार्ड धारकांच्या अडचणी सोडविणार : मा. खंडुभाऊ हिप्परकर.
रेशनकार्ड धारकांच्या अडचणी सोडविणार : मा. खंडुभाऊ हिप्परकर.
सांगोला प्रतिनिधी वैष्णव हेटकळ
सांगोला तालुक्यातील केशरी रेशनकार्ड धारकांच्या हक्काचे रेशन अनेक वर्षांपासुन बंद झाल्याने नागरीकांना स्वस्त धान्य योजनेचा लाभ भेटत नाही. या तालुक्यातील रेशन संबंधीच्या अनेक समस्या सिंहसेनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष मा. खंडु हिप्परकर यांच्या कानावर गेल्यानंतर त्यांनी लक्ष्मीनगर येथे नागरिकांची अचानक बैठक घेतली व नागरीकांनी त्यांच्यासमोर अडचणींचा पाढाच वाचला. अनेक वेळा संबंधित विविध अधिकाऱ्यांकडे व लोकप्रतिनिधींकडे जावुनही हा प्रश्न मार्गी लागत नसल्याने नागरिकांना या ला
भा पासुन वंचित रहावे लागतेय. ही सर्व परिस्थिती व विषयाचे गांभीर्य लक्षात घेता त्यांनी सर्वानुमते 5 ऑगस्टला सांगोला तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचे ठरवले व त्यासंबंधी नियोजन केले.
सदर मोर्चामधे संपुर्ण तालुक्यामधील नागरिक सहभागी होणार असुन न्याय मिळेपर्यंत मागे न हटण्याची भुमिका सिंहसेनेने घेतल्याचे त्यांनी बोलून दाखवले. यावेळी सिंहसेना राजकारण विरहित सर्व प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, सामाजिक अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही देखील हिप्परकर साहेबांनी दिली.
यावेळी अनेक नागरिक उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा