शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत पालखीतील वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, अल्पोपहार व चरणसेवा...

 शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत पालखीतील वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, अल्पोपहार व चरणसेवा...








दिनांक 10/07/2024 रोजी जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्ताने शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा, अल्पोपहार व चरण सेवा करण्यात आली. संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती. पद्माताई भोसले, सचिव डॉ. श्री. गिरीश देसाई सर, खजिनदार मा. श्री. तुषार रंजनकर सर यांच्या संकल्पनेतून सदरील उपक्रम पार पडला. शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत डॉ. सारंगी कुंभार, डॉ. भाग्यश्री चव्हाण ,नर्स गौरी राठोड, नर्स आशा कांबळे, केंद्र प्रमुख मा. श्री. महादेव चव्हाण सर, शिवाजी गोफणे, कोपिवरची शाळा अभ्यासवर्गचे प्रमुख मा. श्री. भारत बोराटे सर यांनी ६०० पेक्षा जास्त वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करून औषधे दिली. या वेळी सर्व वारकऱ्यांना पोहे व चहा - बिस्कीट असा अल्पोपहार देण्यात आला.







 वारकऱ्यांची सेवा करण्याच्या उद्देशाने चरणसेवा करण्यात आली.  शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गेली ४ वर्षे वारकरी सेवा चालू आहे. या कार्यक्रमासाठी ट्रस्टचे विश्वस्त मा. श्री. अरविंद गारटकर सर, संस्थेचे सल्लागार मा. श्री. हमीद भाई आत्तार, ट्रस्टचे इन्चार्ज दिपक जगताप, संस्थेचे पीआरओ सागर कांबळे, जावेद हबीब अकॅडेमी चे प्रमुख अमोल राऊत, फॅशन डिझायनिंग डिपार्टमेंटच्या हेड त्रिशला पाटील, कर्मचारी भारत माने, केदार गोसावी, वैभव हवालदार, विद्या वाघेला व संस्थेचे सर्व विद्यार्थी, तसेच विठाई शर्ट कारखानाचे श्री. सुरज मंगवडे, श्री. नाना व्यवहारे उपस्थित होते. चरणसेवे साठी गौरव खटके, शिव भोसले, सुरज रणमोडे, अनिकेत धुके, ज्ञानेश्वर शिरसट, भूमिका सरडे, संतोषी खांडेकर, जयश्री कोरे, श्रेय शिंदे, अंकिता जावळे, दिपाली अनपट यांचे सहकार्य लाभले. 


संस्थे मार्फत शैक्षणिक उप्क्रमांसोबातच विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबिविले जातात. त्या मध्ये महिला सबलीकरण, उस तोड मजुरांना मोफत आरोग्य तपासणी व त्यांच्या पाल्यांना मोफत शिक्षणासाठी ट्रस्ट काम करत आहे. कौशल्य विकास उपक्रमामध्ये इंदापूर येथे विविध उपक्रम चालू आहेत तसेच रायगड येथे संस्थे मार्फत दिन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजना हा उपक्रम चालू आहे. आत्ता पर्यंत संस्थेच्या सर्व शाखांमधून २५०० पेक्षा जास्त विद्यार्थी प्रशिक्षण घेऊन नोकरी व स्वयंरोजगार मार्फत उत्तम प्रकारे अर्थार्जन करत आहेत. त्या सोबतच बारामती येथे संस्थेच्या जुनिअर कॉलेज च्या शाखेमधून ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. शंकरराव पाटील अक्षय्य शिक्षण योजने मार्फत गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणसाठी मदत मिळत आहे. संस्थे मार्फत महिला सबलीकरण, शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रातील समाजकार्य असेच अविरतपणे सुरु राहणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंडगरवाडी येथिल बंधाऱ्यामध्ये अनोळखी पुरुष जातीचे मयत सापडले

जिल्ह्यातील गट सचिवांना दीपावलीला तीन महिन्याचा पगार बोनस म्हणून द्यावा.

गोरगरीब जनतेसाठी सर्वतोपरी मदतीसाठी धाऊन जाणारा एखतपुर गावचा अवलिया पै.पंकज (Boss) चव्हाण