घोसरवाड ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी राकेश कागले यांची बिनविरोध निवड

 घोसरवाड ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी राकेश कागले यांची बिनविरोध निवड






घोसरवाड/प्रतिनिधी - सुनिल नाईक 

घोसरवाड ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी  राकेश कागले यांची निवड करण्यात आली. मावळते उपसरपंच सुनिता बाळसिंग मिसाळ यांनी  राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त जागी उपसरपंच पदाच्या निवडीसाठी मंगळवारी दि. ०९/०७/२०२४ रोजी दुपारी 2 वाजता ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच साहेबराव साबळे यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक बोलविण्यात आली. यावेळी उपसरपंच पदासाठी राकेश कागले यांचा निर्धारित वेळेत एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने कागले यांची सर्वानुमते बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.






 त्यांना सूचक म्हणून माजी उपसरपंच प्रमोद कांबळे यांनी स्वाक्षरी केली यावेळी प्रशासकीय कामकाज म्हणून ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण यांनी पाहिले नवनियुक्त उपसरपंच राकेश कागले यांनी फटाके गुलाल फेटा यांचा वापर व इतर खर्च न करता शालेय विद्यार्थीसाठी वह्या व पेन वाटप करून सामाजिक उपक्रम राबविले यानिवडी साठी सरपंच साहेबराव साबळे मावळते उपसरपंच सुनिता मिसाळ सुचक सदस्य प्रमोद कांबळे बाळसिंग मिसाळ खंडेराव भोरे अमर माळी सतिश नाईक सुनिल लगड गावातील नेते मंडळी ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंडगरवाडी येथिल बंधाऱ्यामध्ये अनोळखी पुरुष जातीचे मयत सापडले

जिल्ह्यातील गट सचिवांना दीपावलीला तीन महिन्याचा पगार बोनस म्हणून द्यावा.

गोरगरीब जनतेसाठी सर्वतोपरी मदतीसाठी धाऊन जाणारा एखतपुर गावचा अवलिया पै.पंकज (Boss) चव्हाण