तालुकाध्यक्षपदी विनोद(भैय्या) उबाळे, तर महासचिवपदी स्वप्नील सावंत

 वंचित बहुजन आघाडीची सांगोला तालुका कार्यकारिणी जाहीर


तालुकाध्यक्षपदी विनोद(भैय्या) उबाळे, तर महासचिवपदी स्वप्नील सावंत



सांगोला/प्रतिनिधी वंचित बहुजन आघाडीच्या सांगोला तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहिर करण्यात आली आहे.

सदर निवडीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी मांजरी येथील विनोद(भैय्या) उबाळे यांची तर महासचिवपदी स्वप्नील सावंत (चिकमहूद). उपाध्यक्षपदी सुनिल(लकी) कांबळे (सांगोला), विनोदकुमार कसबे (मेडशिंगी), कपिल बनसोडे (सांगोला), अक्षय कांबळे (जवळा). सचिवपदी पांडुरंग (दिपक) होवाळ (वाकी शिवणे) व सचिन उबाळे (एखतपूर). संघटकपदी समाधान होवाळ (वाकी शिवणे), संतोष पवार (सांगोला), दादासाो आलदर (वाकी शिवणे). प्रसिध्दीप्रमुखपदी वैभव काटे (चिकमहूद), सोशल मीडिया प्रमुखपदी भीम मागाडे (मांजरी) यांची तर सल्लागार म्हणून सचिन गोतसूर्य (वाकी शिवणे) यांच्या निवडी करण्यात आल्या. सदर निवडीचे पत्र वंचित बहूजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणी अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशाने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या सहीने देण्यात आले आहे.



या निवडीनंतर नूतन कार्यकारिणीने वंचित बहूजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आद.अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर, प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर, वंचित बहुजन आघाडी माढा लोकसभा जिल्हाध्यक्ष राहुल चव्हाण, वंचित बहुजन आघाडी माढा लोकसभा जिल्हा महासचिव मा.विशाल नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोहचवून पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार तसेच गावनिहाय वंचित बहुजन आघाडी च्या शाखा काढणार तसेच लवकरच सांगोला तालुक्याची विस्तारित कार्यकारणी व शहराची नूतन कार्यकारणी जाहीर करणार असल्याचे नूतन तालुकाध्यक्ष विनोद उबाळे यांनी सांगितले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंडगरवाडी येथिल बंधाऱ्यामध्ये अनोळखी पुरुष जातीचे मयत सापडले

जिल्ह्यातील गट सचिवांना दीपावलीला तीन महिन्याचा पगार बोनस म्हणून द्यावा.

गोरगरीब जनतेसाठी सर्वतोपरी मदतीसाठी धाऊन जाणारा एखतपुर गावचा अवलिया पै.पंकज (Boss) चव्हाण