महर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 137 वी जयंती
महर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 137 वी जयंती
महूद प्रतिनीधी
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 137 वी जयंती निमित्त श्री शिवाजी विद्यालय व जुनिअर कॉलेज महूद बुद्रुक प्रशालेचे कलाशिक्षक श्री प्रशांत रघुनाथ सुतार यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून कर्मवीर भाऊराव पाटील यांचे सहा फुटाचे हुबेहूब तेलचित्र रेखांकन केले.
तसेच कर्मवीर जयंती मिरवणुकीसाठी मोराचा रथ तयार करून कर्मवीर आण्णांना आपल्या कलेच्या माध्यमातून विनम्र अभिवादन केले.
कर्मवीर जयंती मिरवणुकीच्या वेळी उपस्थित असलेले प्रशालेचे प्राचार्य, स्कूल कमिटी, सर्व माजी विद्यार्थी व शिक्षण प्रेमी, शिक्षक वृंद, परंतु पंचक्रोशीतील सर्व नागरिक यांनी याप्रसंगी श्री सुतार सरांचे कौतुक केले व कर्मवीर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा