आबासाहेबांचे विचार सोडणार नाही -पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.बाबासाहेब देशमुख
आबासाहेबांचे विचार सोडणार नाही -पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.बाबासाहेब देशमुख
सांगोला प्रतीनिधी
आबासाहेबांचा विच्यारावरती राजकीय व सामाजीक वाटचाल करणे कठीण काम असले तरीही सांगोला विधानसभा मतदार संघातील जनतेच्या पाठबळावर व विश्वासावर मी शिवधनुष्य उचलण्याचा निर्णय घेतला आहे. वाट्टेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल परंतु आबासाहेबांचा विचार सोडणार नसल्याचे मत पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केला.
राजकारण करीत असताना आबासाहेबांनी निष्ठेला ज्यादा महत्व दिले होते.
आबासाहेबांनी निष्ठा जोपासत असताना कुठल्याही अमिषाला व कुठल्याही एका प्रलोभाला बळी पडले नाहीत. आयुष्यभर आबासाहेबांनी निष्ठा जपली. तसेच संपुर्ण राजकीय प्रवासात आबासाहेबांनी एका रुपयांचा भ्रष्टाचार केला नाही. ५५ वर्षे आमदार असुन आबासाहेबांनी स्वता:चा व आपल्या कुटुंबाचा विकास केला नाही. संपुर्ण जनता हेच आपले कुटुंब समजुन त्यांनी काम केले. आबांनी आपल्या संपुर्ण राजकीय कारकिर्दीत आपल्या स्वतावरती भ्रष्टाचाराचा एक डाग सुध्दा पडू दिला नाही. निष्कलंक व चारित्र्य संपत्र राहात आपली राजकीय व सामाजीक क्षेत्रातील यशस्वी वाटचाल केली.
डॉ. गणपतरावजी देशमुख उर्फ आबासाहेब यांनी आपल्या प्रदिर्घ राजकीय वाटचालीत एकाच पक्षात राहुन एकाच मतदार संघातून विधानसभेची निवडणुक लढवली व ११ वेळा निवडुन येण्याचा विश्वविक्रम आबासाहेबांनी केला. विशेष करुन आबासाहेबांनी राजकारणाचा वापर फक्त समाजसेवेसाठी केला. राजकारणाच्या माध्यमातुन अनेक विकास कामे केली. ती विकास कामे करीत असताना निष्कलंक राहुन विकास कामे केली. विकास कामे करीत असताना सर्व समावेशक विकास केला,समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाची गंगा पोहचली पाहीजे यासाठी जाणीवपुर्वक सतत प्रयत्न केले. त्यामुळे वाट्टेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल परंतु आबासाहेबांचा विचार सोडणार नसल्याचे मत डाँ बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा