जनतेचा आशीर्वाद हाच माझा ऊर्जा स्त्रोत - आमदार शहाजीबापू पाटील
रेकॉर्ड ब्रेक निधी दिल्याबद्दल खवासपूर ग्रामस्थांच्या वतीने आमदार शहाजीबापूंचा नागरी सत्कार
सांगोला (तालुका प्रतिनिधी): ३५ वर्षाच्या प्रदीर्घ राजकीय संघर्षात तालुक्यातील जनतेने मला साथ दिली. माझ्या संपूर्ण आयुष्यात याची उतराई होऊ शकत नाही इतके माझ्यावर जनतेचे उपकार आहेत. जनतेच्या पाठिंबावरच विकास कामांसाठी पाच हजार कोटी रुपयांचा निधी आणू शकलो. जनतेला भेटल्यानंतर मला काम करण्याची ऊर्जा मिळते. जनतेची सेवा या ध्येयानेच मी काम करीत असून
जनतेचा आशीर्वाद हाच माझा ऊर्जा स्त्रोत आहे असे प्रतिपादन आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले.
सांगोला तालुक्यातील खवासपूर गावासाठी ३१ कोटी ८५ लाख रुपयाचा निधी दिल्याबद्दल तसेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेसाठी ८८३ कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल तसेच माण नदीवरील सर्व बंधारे वर्षातून तीन वेळा भरून देण्याची तरतूद केल्याबद्दल
खवासपूर ग्रामस्थांच्या वतीने आमदार शहाजीबापू पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. पुढे बोलताना आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तालुक्यातील ८० हजार महिलांना लाभ झाला आहे. तालुक्यातील एक लाख महिलांना या योजनेच्या लाभ मिळवून देण्याचे माझे उद्दिष्ट आहे. माझ्या ऑफिसला आलेला एक व्यक्ती आतापर्यंत रिकाम्या हाताने परत गेली नाही. माझ्या ३५ वर्षाच्या प्रदीर्घ राजकीय संघर्षात तालुक्यातील जनतेने मला साथ दिली आहे. जनतेच्या आशीर्वादावरच मी आजारातून पूर्णपणे बरा झालो असून जनता हेच माझे टॉनिक आहे असे प्रतिपादन आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर माजी जिल्हा परिषद सदस्य गोविंद जरे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ, महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख राणी माने, ओबीसी आघाडीचे जिल्हाप्रमुख शिवाजी घेरडे, शिवसेना नेते दिग्विजय पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे, युवासेना तालुकाप्रमुख गुंडादादा खटकाळे, मागासवर्गीय आघाडीचे तालुकाप्रमुख दीपक ऐवळे, विद्यार्थी संघटनेचे जिल्हाप्रमुख प्रितेश दिघे, विद्यार्थी संघटनेचे तालुकाप्रमुख अजिंक्य शिंदे, माजी सरपंच लक्ष्मण भोसले, केशर भोसले, बाळासाहेब भोसले, शामराव बागल, सतीश पाटील, राजू गायकवाड, विकी भोसले, सौदागर सावंत, विनोद ऐवळे, आबा ऐवळे, पैलवान धनाजी बोडरे, मुरलीधर जरे, सुरेश जरे ल, दुर्योधन जरे, जयवंत भोसले, मनीषा भोसले, रोहिणी बागल, हेमा बोडरे, रूपाली गायकवाड, कल्पना जरे, अनिता भोसले, महादेव ऐवळे, शहाजी सावंत, संदीप सावंत, अमोल वाघमारे, दादा माने, संजय भोसले, निलेश भोसले, सतीश पाटील, मधुकर फुले यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी खवासपूर गावामध्ये शिवसेना, युवासेना, शिवसेना मागासवर्गीय आघाडी, शिवसेना महिला आघाडीच्या शाखांचे उद्घाटन करण्यात आले.
चौकट
भर पावसात आमदार शहाजीबापूंचा सत्कार
यावेळी खवासपूर गावातील आजी-माजी सैनिक, पोलीस अधिकारी, डॉक्टर, वकील, अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, शिक्षक व इंजिनियर यांचा एकत्रित सत्कार करण्यात आला. खवासपूर गावाच्या विकासासाठी रेकॉर्ड ब्रेक निधी दिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आमदार शहाजीबापू पाटील यांचा नागरिक सत्कार करण्यात आला. भर पावसात आ.शहाजीबापूंच्या सत्कारासाठी ग्रामस्थांनी हजेरी लावली होती.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा