शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता हा खंबीर आहे. कष्टकरी, कामगारांसाठी लढणारा, कायम आपल्या तत्वांशी एकनिष्ठ असणार्‍या शेकापची भुमिका आणि धोरणे वेगळी आहेत.

शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता हा खंबीर आहे. कष्टकरी, कामगारांसाठी लढणारा, कायम आपल्या तत्वांशी एकनिष्ठ असणार्‍या शेकापची भुमिका आणि धोरणे वेगळी आहेत. 












      सांगोला प्रतिनिधी

शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता हा खंबीर आहे. कष्टकरी, कामगारांसाठी लढणारा, कायम आपल्या तत्वांशी एकनिष्ठ असणार्‍या शेकापची भुमिका आणि धोरणे वेगळी आहेत. त्यामुळे जिल्ह्यात, राज्यासह सांगोला तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाने स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे.शेकापने कायम संघर्षातून अस्तित्व निर्माण केले आहे. स्व. आबासाहेबांनी वेगळे अस्तित्व निर्माण केले होते. हेच अस्तित्व ,ओळख आता पुन्हा आपल्याला निर्माण करायचे आहे. आगामी काळात खचून न जाता नव्या उमेदीने काम करु. निवडणूकीत विजय मिळवून एक वेगळा इतिहास निर्माण करायचा आहे. शेकाप पुन्हा इतिहास घडवेल असा विश्वास व्यक्त करत येणार्‍या काळात सांगोला विधानसभा मतदारसंघावर शेतकरी कामगार पक्षाचा लाल झेंडा फडकावून स्वर्गीय आबासाहेबांचे स्वप्न पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याची ग्वाही डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिली.




सांगोला तालुक्यातील यलमार मंगेवाडी येथे आयोजित कार्यक्रमात शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भर पावसात मोटारसायकल रॅली काढून डॉ.बाबासाहेब देशमुख यांचे उत्साहात स्वागत केले.यावेळी डॉ.बाबासाहेब देशमुख बोलत होते. यावेळी शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

पुढे बोलताना डॉ.बाबासाहेब देशमुख म्हणाले, विद्यमान लोकप्रतिनिधींनी गेल्या 5 वर्षात केलेल्या कारभारावर तालुक्यात मोठा असंतोष निर्माण झालेला आहे. नागरिकांमध्ये टक्केवारी, भष्ट्राचार व विकासकामांचा घसरलेला दर्जा यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये चिड दिसून येत असून जनतेत प्रचंड असंतोष आहे.आगामी विधानसभा निवडणूकीत आपलाचा उमेदवार निवडून आला पाहिजे, या भूमिकेतून कार्यकर्त्यांनी मोठ्या जिद्दीने व मनात चिड ठेवून काम करायचे आहे. आपली बांधिलकी गोरगरीबांसोबत आहे. त्यांना केंद्रबिंदू मानून कार्यकर्त्यांनी काम करणे आवश्यक आहे. आगामी निवडणूकीत विजय मिळवून एक वेगळा इतिहास निर्माण करायचा आहे. त्यासाठी कार्यकत्यांनी आतापासूनच कामाला लागा, जे फितूर होतात, त्यांना त्यांची जागा दाखविणे आवश्यक असून असा विजय मिळवा. की पुन्हा विरोधक उभा राहणार नाही, अशी अपेक्षा शेवटी डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंडगरवाडी येथिल बंधाऱ्यामध्ये अनोळखी पुरुष जातीचे मयत सापडले

जिल्ह्यातील गट सचिवांना दीपावलीला तीन महिन्याचा पगार बोनस म्हणून द्यावा.

गोरगरीब जनतेसाठी सर्वतोपरी मदतीसाठी धाऊन जाणारा एखतपुर गावचा अवलिया पै.पंकज (Boss) चव्हाण