सार्वजनीक गणेश मंडळांनी सामाजीक सलोख्याची परंपरा कायम ठेवावी--डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख
सार्वजनीक गणेश मंडळांनी सामाजीक सलोख्याची परंपरा कायम ठेवावी--डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख.
महूद प्रतिनिधी
सध्या महाराष्ट्रासह देशभर गणेशोस्तव मोठ्या थाटामाटाने व भक्तीभावाने साजरा केला जातो.गावोगावी व घरोघरी गणेशाची प्राण प्रतिष्ठापना केली जाते.घरोघरी आनंदाचे वातावरण असते..
गावोगावी व अनेक शहरांमध्ये सार्वजनीक गणेश मंडळे गणपती बसवत आसतात.या मंडळाध्ये अनेक जाती-धर्माची वेगवेगळी तरुण मुले सहभागी असतात.या मंडळाच्या माध्यमातुन गणेशोस्तव काळात जास्तीत जास्त सामाजीक उपक्रम राबवणे गरजेचे आहे.आसे सामाजीक उपक्रम बहुतांश मंडळे परंपरेने राबवत आली आहेत..आशा मंडळाचे अनुकरण इतरही मंडळाने घेतले पाहीजे.गणेशोस्तव हा महाराष्ट्रातील प्रमुख उस्तव आहे.या कडे सकारात्मक दृष्टीने पाहीले पाहीजे.गणेशोस्तव हा प्रत्येकांच्या क्षृद्धेचा विषय आसला पाहीजे आंधक्षृध्देचा नसला पाहीजे.काही सार्वजनीक गणेश मंडळांमध्ये रक्तदान शिबिरे ,खाऊ वाटप,शालेय साहित्य वाटप,वकृत्व स्पर्धा,रांगोळी स्पर्धा ,आसे एक ना अनेक उपक्रम राबवत असतात. आशा मंडळाचे अनुकरण इतरही मंडळांनी केले तर हा गणेशोस्तव आणखीन चांगल्या प्रकारे साजरा होईल.
आशा उपक्रमामुळे मुला मुलींच्या सुप्त गुणांना वाव मिळतो व आपले कला गुण दाखवण्याची संधी उपलब्ध होते.त्यांच्या कला गुणांना वाव मिळतो.आशा उद्दात हेतुने गणेशोस्तव साजरा केला पाहीजे. देशातील व राज्यातील जनता पुर्णता महागाई,भ्रष्टाचार यामुळे त्रस्त झाली आहे.डिझेल,पेट्रोलचे दर भरमसाठ वाढल्यामुळे व आपोआपच महागाईने उच्चांक गाठला आहे..कोणतेही काम असो ते चिरीमिरी दिल्याशिवाय होत नाही..काही लोक स्वताच्या फायद्यासाठी सामाजिक वातावरण गढुळ करीत आहेत.आशा कठीण परस्थीतीत नागरीकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.सकाळी उठल्यापासुन ते रात्री झोपे पर्यंत अनेक समस्यांचे ओझे घेऊन नागरीकांना आपल्या कुटुंबाचा गाडा हाकावा लागत आहे..आशा दगदगीच्या जिवनात आपले परंपरागत उस्तव हेच आपले मानसीक स्वास्थ्य चांगले ठेवु शकतात..सार्वजनिक गणेशोस्तवा सारख्या उस्तवाच्या माध्यमातुन लोकांना सामाजीक भान बाळगण्याचे प्रयत्न केले जावेत...काही मंडळे तसा प्रयत्न जाणीवपुर्वक करीत आहेत आशा मंडळाचे अनुकरण करणे सध्य स्थितीत गरजेचे आहे.उदाहरण द्यायचे झाल्यास गणेशोस्तव मंडळांनी महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजीत केला गेला तर वेगवेगळ्या समाजातील स्रीया या एकत्रीत येऊ शकतात त्यां महिलांमध्ये सुसंवाद घडु शकतो..विचारांची देवाण घेवाण होऊ शकते..व यातुन समाजातील सर्व धर्म समभाव आपोआपच वाढीस लागला जातो.आसे अनेक सामाजीक उपक्रम आहेत..पारंपारीक खेळ आहेत..सांस्कृतीक कार्यक्रम आहेत..विविध स्पर्धा आहेत याचे आयोजन मंडळांनी केलेच पाहिजे.या उपक्रमामध्ये सर्व जाती धर्माचे तरुण-तरुणी व ईतर नागरीक सहभागी झाल्याने जातीय व धार्मीक सलोखा आपोआपच वाढला जातो.धार्मीक व जातीय सलोखा वाढल्याने समाजा समाजामध्ये सुरक्षतेची भावना आपोआपच निर्माण होईल.देशाचा,राज्याचा जिल्ह्याचा,तालुक्याचा गावाचा व समाजाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर सर्व धर्म समभाव जपणे गरजेचे आहे..आशा अनेक गोष्टी आपल्या विविध उस्तवाच्या माध्यमातुन केल्या गेल्या पाहिजेत. आज गावोगावी विविध समाजातील व विविध धर्मातील तरुण मुले एकत्रीत येऊन मोठ्या प्रमाणात गणेशोस्तव साजरा केला जात आहे ..आशा वेळेस सार्वजनिक गणेश मंडळांनी सामाजीक सलोख्याची असलेली आपली परंपरा कायम ठेवण्यासाठी जाणीवपुर्वक वेगवेगळ्या माध्यमातुन प्रयत्न केले पाहिजेत असे मत पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केल्याची माहिती प्रसिध्दी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा