देवळे येथील रामोशी समाजाकडून डॉ.बाबासाहेब देशमुख यांना एकमुखी पाठिंबा

 देवळे येथील रामोशी समाजाकडून डॉ.बाबासाहेब देशमुख यांना एकमुखी पाठिंबा



सांगोला(प्रतिनिधी):-शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉ.बाबासाहेब देशमुख व डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत सांगोला तालुक्यातील देवळे येथील रामोजी समाजाने शेतकरी कामगार पक्षास एक मुखी पाठिंबा देवून डॉ.बाबासाहेब देशमुख यांना निवडुन आणण्याचा संकल्प केला. 

पाठिंबा देते प्रसंगी शिवाजी मंडले, दिनकर चव्हाण, तुकाराम चव्हाण , तानाजी मंडले , शशिकांत चव्हाण,धनाजी चव्हाण, समाधान चव्हाण, जयसिंग चव्हाण, बाजीराव चव्हाण ,बाजीराव चव्हाण, मल्हारी चव्हाण, माळाप्पा खरात, दत्ता खांडेकर, गणेश मंडले, रंगा चव्हाण, विनायक चव्हाण, सौरभ मंडले, समाधान चव्हाण, दादा चव्हाण यांच्यासह रामोशी समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

आगामी निवडणुकीला ध्यानात ठेवून प्रस्थापित नेत्यांकडून समाजासमाजात भांडणं लावण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे हे सर्वसामान्य जनतेला दिसतंय. शेतकरी कामगार पक्षाकडून आजपर्यंत असे घाणेरडे राजकारण कधीच केले नाही. शेकाप विरोधी नेतृत्व जेव्हाही सांगोला तालुक्यात बनते, तेव्हा या नेतृत्वाकडून समाजात फूट पाडणे किंवा भांडणे लावणे हा प्रकार झाला आहे. सत्तेशिवाय ही लोक राहू शकत नाही. संगोल्याची प्रतिमा मलिन करणे. जनतेत भ्रम निर्माण करणे हे काम सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे.त्याच प्रमाणे सर्वसामान्य जनतेवर अन्याय वाढल्या मुळे तसेच सर्वसामान्य जनतेमधून शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या बद्दल मोठी सहानुभूती दिसून येत असल्यामुळे येणार्‍या निवडणुकीत देखील शेतकरी कामगार पक्षाचा दणदणीत विजय होणार असल्यामुळे आम्ही शेतकरी कामगार पक्षाला एकमुखी पाठिंबा देत असल्याचे पाठिंबा देणार्‍या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंडगरवाडी येथिल बंधाऱ्यामध्ये अनोळखी पुरुष जातीचे मयत सापडले

जिल्ह्यातील गट सचिवांना दीपावलीला तीन महिन्याचा पगार बोनस म्हणून द्यावा.

गोरगरीब जनतेसाठी सर्वतोपरी मदतीसाठी धाऊन जाणारा एखतपुर गावचा अवलिया पै.पंकज (Boss) चव्हाण