एखतपुरात शहाजीबापू गटाला धक्का... कार्यकर्त्यांचा दिपकआबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
एखतपुरात शहाजीबापू गटाला धक्का... कार्यकर्त्यांचा दिपकआबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
सांगोला : तालुका प्रतिनिधी
शहाजीबापू गटातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून तसेच पक्ष नेतृत्वाच्या मनमानी कारभाराला कंटाळून सांगोला तालुक्यातील एखतपुर येथील शहाजीबापू गटाच्या कट्टर कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करून मशाल हाती घेतली. एखतपुर येथील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने शहाजीबापू गटाला खिंडार पडले आहे.
विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून सांगोला तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दिपकआबा साळुंखे पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सांगोला तालुक्यातील शेतकरी कामगार पक्ष आणि शहाजीबापू गटामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. शेकापसह शहाजीबापू पाटील गटाला सोडचिट्टी देत आतापर्यंत हजारो कार्यकर्त्यांनी दिपकआबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवेश करून मशाल हाती घेतली आहे.
एखतपुर ता.सांगोला येथील माजी सरपंच जालिंदर (दादा) इंगोले, लक्ष्मण तात्या इंगोले, निलेश पोपट इंगोले, भाजपचे नेते कृष्णदेव इंगोले, पांडुरंग वासुदेव इंगोले, संजय शिवाजी इंगोले, प्रशांत वसंत इंगोले, दत्तात्रय आबा इंगोले, शहाजी बिले, वसंत गोरख इंगोले, अजित शिवाजी इंगोले, रणजित घाडगे, धनाजी रंगराव जाधव यांच्यासह एखतपुर येथील असंख्य कार्यकर्त्यांनी दिपकआबा साळुंखे पाटील यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याची ग्वाही देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. यावेळी माजी सरपंच सदाशिव नवले उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा