मलीदा गॅंगचा भ्रष्ट कारभार नष्ट करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाला साथ द्या.- बाबासाहेब देशमुख.
मलीदा गॅंगचा भ्रष्ट कारभार नष्ट करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाला साथ द्या.- बाबासाहेब देशमुख.
सांगोला(प्रतिनिधी):-
आज वाणीचिंचाळे गावांमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बाबासाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा हनुमान मंदीरात घेण्यात आली.यावेळी बोलताना अनिकेत देशमुख यांनी तालुक्यातील विविध विकासाच्या मुद्द्यावर विरोधकांना घेरण्याचा प्रयत्न केला. तालुक्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असून मोठ्या प्रमाणात अवैध धंदे ,अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात आमदाराच्या आशीर्वादाने सुरू असल्याचे सांगितले. त्यामुळे तालुक्यातील वातावरण चांगले करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराला साथ द्या असे सांगितले.
सांगोला विधानसभा मतदारसंघात सत्ता नसतानाही डॉ.बाबासाहेब देशमुख व डॉ.अनिकेत देशमुख नेहमी मतदारांच्या संपर्कात राहिले आहेत. सर्वसामान्यांचा अडचणी सोडविल्या आहेत.त्याचप्रमाणे सर्वांच्या सर्व दु:खातही सामील झाले आहेत. त्याचप्रमाणे डॉ.बाबासाहेब देशमुख हे दिवसांतून 14 ते 16 तास जनतेच्या सेवेत असतात, गेल्या 5 वर्षात सत्ता नसतांनाही सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी त्यांचे विविध माध्यमातून सामाजिक कार्य सुरूच होते. कै.डॉ.गणपतराव देशमुख यांनी सांगोला विधानसभा मतदार संघ हे कुटुंब मानून मतदार संघाला 55 वर्षे न्याय दिला.
या सभेत बोलताना बाबासाहेब देशमुख यांनी तालुक्यातील विविध प्रश्नावर रोखठोक मत व्यक्त केलं .तसेच तालुक्यात
मागच्या 5 वर्षामध्ये सांगोला तालुक्यात मलिंदा गँग तयार झाली होती. त्या मलिंदा गॅगने तालुक्यामध्ये कामे फक्त दाखवायला ठेवली होती. गेल्या 5 वर्षात सर्वसामान्य जनतेची प्रशासकीय कार्यालयात कामे झाली नाहीत कारण प्रत्येक ठिकाणी पाकिटे मागितली गेली.भयभुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त सांगोला तालुका करण्यासाठी जनताच परिवर्तन करेल असे अशी अपेक्षा व्यक्त करत शिट्टी या चिन्हासमोरील बटन दाबून मला बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केले.
यावेळी मोठ्या पद्धतीने शक्तीप्रदर्शन करून शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराचे महिलांच्या वतीने औक्षण करून स्वागत करण्यात आले . शिट्टी वाजवत प्रचार करण्यात आला .
यावेळी युवक नेते अनिरुद्ध पाटील, जितेंद्र गडहिरे यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिलावर्ग उपस्थित होत्या.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा