डॉ.अविनाश खांडेकर तालुका वैद्यकीय अधिकारी यांची चौकशी करून गडचिरोली ला बदली करण्याची नागरिकांची मागणी.

 

 डॉ.अविनाश खांडेकर तालुका वैद्यकीय अधिकारी  यांची चौकशी करून गडचिरोली ला बदली करण्याची नागरिकांची मागणी.



तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यास प्रोटोकॉलचा विसर... नूतन आमदारांना उद्घानासाठी बोलावले पण ते येण्याअगोदरच उद्घाटन उरकले..


सांगोला (तालुका प्रतिनिधी) आरोग्य विभाग सोलापूर यांच्या कडून सांगोला तालुक्यातील ६  ग्रामीण आरोग्य केंद्रासाठी सहा अँब्युलन्स आल्या होत्या त्यांचे उद्घाटन प्रसंगी विद्यमान आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांना डावलल्याची घटना घडल्याने सांगोला येथील आरोग्य अधिकारी डॉ.अविनाश खांडेकर यांनी प्रोटोकॉल न पाळल्यामुळे तसेच यांच्या कारभाराविषयी संताप व्यक्त केला जात आहे.तर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अविनाश खांडेकर यांची चौकशी व कारवाई करून गडचिरोली ला बदली करण्याची नागरिकांची मागणी नागरिकाकडून केली जात आहे.

         सांगोला तालुक्यातील आरोग्य केंद्रावर ॲम्बुलन्स नादुरुस्त झाल्या होत्या त्यामुळे आरोग्य विभागाने सोलापूर आरोग्य विभागास नवीन ॲम्बुलन्सची मागणी केली होती त्यानुसार सांगोला तालुक्यातील नाझरा, अकोला, महूद, कोळा, जवळा व घेरडी अशा सहा ठिकाणी नवीन ॲम्बुलन्स सांगोला येथील पंचायत समितीमध्ये शनिवारी दुपारी दाखल झाल्या होत्या,

  ॲम्बुलन्सचे उद्घाटन करण्यासाठी अनेक लोकप्रतिनिधींना बोलावण्यात आले होते त्यामध्ये विद्यमान आ. बाबासाहेब देशमुख यांनाही निमंत्रण दिले होते त्यानुसार आ. डॉ. देशमुख हे  शनिवार दि.३० नोव्हेंबर रोजी सांगितलेल्या वेळेवर उपस्थित झाले परंतु विद्यमान आमदार येण्याच्या अगोदरच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अविनाश खांडेकर यांनी ॲम्बुलन्सचा उद्घाटन सोहळा करून घेतला, 

आ. डॉ. देशमुख हे उद्घाटन साठी आले परंतु त्या अगोदरच उद्घाटन झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी उद्घाटन झाले आहे मी परत कशाला उद्घाटन करू असे म्हणून निघून गेले. तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निमंत्रणानुसार आमदार आले परंतु ते येण्याच्या अगोदरच उद्घाटन सोहळा उरकल्याने तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे.

      सोलापूर येथून नवीन ॲम्बुलन्स आलेल्या होत्या, अंबुलन्सच्या उद्घाटनासाठी आ. डॉ.बाबासाहेब देशमुख यांना बोलवले होते ते वेळेवरही आले होते परंतु ते येण्याच्या अगोदरच उद्घाटन समारंभ होत असेल तर चुकीचे आहे ,प्रोटोकॉल नुसार आमदारांच्या हातून उद्घाटन व्हावयास हवे होते यामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्याचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे, जर नूतन आमदारांचा योग्य तो सन्मान होत नसेल तर हा तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याचा निष्काळजीपणा आहे, याची चौकशी व्हावी असे आनंदराव यमगर भोपसेवाडी ता.सांगोला यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंडगरवाडी येथिल बंधाऱ्यामध्ये अनोळखी पुरुष जातीचे मयत सापडले

जिल्ह्यातील गट सचिवांना दीपावलीला तीन महिन्याचा पगार बोनस म्हणून द्यावा.

गोरगरीब जनतेसाठी सर्वतोपरी मदतीसाठी धाऊन जाणारा एखतपुर गावचा अवलिया पै.पंकज (Boss) चव्हाण