उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी आमदार शहाजीबापू पाटील यांची मुंबईत भेट.
उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी आमदार शहाजीबापू पाटील यांची मुंबईत भेट.
सांगोला : प्रतिनिधी
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे उपनेते माजी आमदार शहाजीबापू पाटील यांची रविवार दि २ जानेवारी रोजी मुंबई येथे भेट संपन्न झाली.
या बैठकीत सांगोल्याच्या रखडलेल्या विकास कामावर प्रदीर्घ चर्चा झाली. राज्यातील निवडणूक निकालानंतर आणि सध्या सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीत ही भेट राजकीय वर्तुळात महत्त्वाची मानली जात आहे.
शिवसेनेचे स्टार प्रचारक आणि महाराष्ट्राचे सेलिब्रिटी नेते म्हणून शहाजीबापू पाटील यांची राज्यभर ओळख आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत शहाजीबापू पाटील यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले होते. महाराष्ट्रातील ऐतिहासिक सत्ता परिवर्तनानंतर माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सांगोला तालुक्यासाठी सुमारे ५ हजार कोटींचा विकास निधी मंजूर करून आणला होता.
गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर सांगोला तालुक्यातील विकास कामांना काही प्रमाणात ब्रेक लागला होता. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे व शहाजीबापू पाटील यांची ही भेट महत्त्वाची मानली जाते. शहाजीबापूंनी मंजूर केलेल्या विकास निधीतील अनेक कामे सध्या प्रगतीपथावर असून याच कामांचा आढावा आणि इतर प्रलंबित प्रश्नांवर या बैठकीत चर्चा झाली.
शहाजी बापूंच्या राजकीय पुनर्वासनाची चर्चा सांगोला तालुक्यात
शहाजी बापू पाटील हे शिवसेनेचे स्टार प्रचारक आणि महत्त्वाचे नेते मानले जातात. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मानले जातात विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यापासून शिवसेना पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पाटील यांचे राजकीय पुनर्वसन करतील अशी आशा कार्यकर्त्यांना आहे एकनाथ शिंदे व शहाजी बापूंच्या भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे या भेटीमुळे पुन्हा एकदा शहाजी बापूंच्या राजकीय पुनर्वसनाची चर्चा सांगोला तालुक्यात व खेडोपाडी वाड्यावर जोर धरू लागली आहे.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा