बेकायदेशीर खडी क्रेशर बंद करा अन्यथा तीव्र आंदोलन करू - सौरभ उर्फ अमर शिंदे

 बेकायदेशीर खडी क्रेशर बंद करा अन्यथा तीव्र आंदोलन करू - सौरभ उर्फ अमर शिंदे 



 सांगोला प्रतिनिधी 

 सांगोला:- बेकायदेशीर खडी क्रेशर बंद करावेत अन्यथा तीव्र आंदोलन करू असे निवेदन सौरभ उर्फ अमर शिंदे यांनी दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी सांगोला तालुक्याचे तहसीलदार संतोष कणसे साहेब यांना दिले आहे  

सांगोला तालुक्यात चालू असलेले बेकायदेशीर खडी क्रेशर हे हरित लवादाची परवानगी न घेता चालू केलेले आहेत तसेच शासनाची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता अटी व शर्तीचा भंग केला असून सदर खडी क्रेशर मालकांनी दगड खाणीतून अतिरिक्त उत्खनन केल्या कामे सर्व खडी क्रेशर याची ईटीएस मोजणी करून शासनाची रॉयल्टी भरून घ्यावे व बेकायदेशीर सर्व खडी क्रेशर चालू केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत

 अन्यथा तीव्र आंदोलन करू असे निवेदन सौरभ उर्फ अमर शहाजी शिंदे राहाणार वासुद (अकोला)यांनी सांगोला तालुक्याचे तहसीलदार संतोष कणसे यांना निवेदन दिले यावेळेस कालिदास कसबे, प्रशांत यादव, राहुल कोडक, निखिल पवार, हे उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंडगरवाडी येथिल बंधाऱ्यामध्ये अनोळखी पुरुष जातीचे मयत सापडले

जिल्ह्यातील गट सचिवांना दीपावलीला तीन महिन्याचा पगार बोनस म्हणून द्यावा.

गोरगरीब जनतेसाठी सर्वतोपरी मदतीसाठी धाऊन जाणारा एखतपुर गावचा अवलिया पै.पंकज (Boss) चव्हाण