सांगोला तालक्यातील पाणी प्रश्नांसंदर्भात आ. डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी घेतली मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट
सांगोला तालक्यातील पाणी प्रश्नांसंदर्भात आ. डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी घेतली मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट
सांगोला: सांगोल्याचे आमदार डॅा. बाबासाहेब देशमुख यांनी राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची सांगोला तालुक्यातील पाणी प्रश्नासंदर्भात भेट घेत त्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
यावेळी सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असुन पाण्याची पातळी खालावलेली आहे. नदी,तलाव, बंधारे, ओढे,नाले कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. सध्या मतदारसंघातील पाणी प्रश्न मार्गी लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली असून काही ठिकाणी पाण्याआभावी पिके जळून जाण्याचा धोका निर्माण झालेला आहे.
तरी तालुक्यातील पिकांना जीवदान देण्यासाठी टेंभू तसेच म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरु करून माण व कोरडा नदी वरील सर्व बंधारे लवकरात लवकर भरून द्यावेत त्याचबरोबर सध्या सांगोला विधानसभा मतदारसंघातील बरेचसे क्षेत्र नीरा उजवा कालव्याच्या लाभक्षेत्रा मध्ये येते. सद्य स्थितीमध्ये लाभक्षेत्रा मध्ये उन्हाची त्रीवता वाढली असल्याने पिकांना तातडीने पाण्याची आवश्यकता भासत असून दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली असुन पाण्याची पातळी खालावलेली आहे. तरी नीरा उजवा कालव्याचे सन २०२४-२०२५ चे उन्हाळी आवर्तन तातडीने सुरु करावे तसेच सोनके तलाव लवकरात लवकर भरून देण्यात यावा आणि म्हसवड ( राजेवाडी ) या मध्यम प्रकल्प योजनेतून कटफळ तलावात पाणी सोडण्यात येवून आगामी उन्हाळी आवर्तन मिळावे अशी निवेदनाद्वारे मागणी केली. यावेळी मंत्री महोदयांनी यावर सकारात्मकता दर्शवत लवकरात लवकर यावर कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा