घोसरवाडच्या सिध्देश्वर यात्रेस प्रारंभ

 घोसरवाडच्या सिध्देश्वर यात्रेस प्रारंभ



घोसरवाड/प्रतिनिधी सुनिल नाईक 

 घोसरवाड (ता. शिरोळ) येथील ग्रामदैवत श्री सिध्देश्वर देवाच्या विशाळी यात्रेस मंगळवारपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. 


सिध्देश्वर यात्रेच्या पहिल्या दिवशी श्री सिध्देश्वर देवाची पालखी आई सावित्रीदेवी हा यांच्या भेटीसाठी दूधगंगा नदीकाठावरील सावित्री देवीच्या मंदिराकडे नेण्यात आली. यावेळी गावातील अन्य पालख्याही मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. यावेळी पहिल्या दिवसाची यात्रा दूधगंगा नदीकाठावर भरवण्यात आली. यावेळी ग्रामस्थांसह भाविकांनी भाजी-भाकरी, उसळ, भात, आंबिल, कोरट्याची चटणी, भरले वांगे असा नैवेद्य सिध्देश्वर देवास अर्पण केला. त्यामुळे शंभू महादेव


मंदिरासमोर यात्रेकरूंची मोठी गर्दी आणि उत्साह दिसून आला.


घोसरवाडचे ग्रामदैवत सिध्देश्वर देवाची यात्रा ही पंचक्रोशीत प्रसिध्द आहे. यात्रा काळात विविध ठिकाणाहून भाविक दर्शनासाठी येतात. मंगळवारपासून यात्रेस प्रारंभ झाला असून पहिल्या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रम, पालखी मिरवणूक असे कार्यक्रम पार पडले. बुधवारी यात्रेचा दुसरा दिवस असून यावेळी नैवेद्य अर्पण करणे व विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. गुरुवार हा यात्रेचा तिसरा आणि मुख्य दिवस असल्याने यावेळी पूरणपोळीचा नैवेद्य अर्पण करणे आणि विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. यात्रेनिमित्त घोसरवाडेत उत्साहाचे वातावरण पसरले आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंडगरवाडी येथिल बंधाऱ्यामध्ये अनोळखी पुरुष जातीचे मयत सापडले

जिल्ह्यातील गट सचिवांना दीपावलीला तीन महिन्याचा पगार बोनस म्हणून द्यावा.

गोरगरीब जनतेसाठी सर्वतोपरी मदतीसाठी धाऊन जाणारा एखतपुर गावचा अवलिया पै.पंकज (Boss) चव्हाण