घोसरवाड येथे उरुस निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले
घोसरवाड येथे उरुस निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले
घोसरवाड/ प्रतिनिधी सुनिल नाईक
घोसरवाड ताः शिरोळ येथे सालाबादप्रमाणे हिंदू-मुस्लिम उरुस कमिटीच्या वतीने हजरत ख्वॉजा शमनामिरा व हजरत ख्वॉजा अडीकुडी इमामसाहेब यांच्या उरुसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे गुरुवार दि 6 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता मेहरबान काझीसाहेब विजितबाबा शिंदे यांच्या मानाचा गलिफ व गंध पारंपारिक रिवाज नुसार देवास आर्पण करण्यात येणार आहे शुक्रवार 7 फेब्रुवारी 2025 रोजी महानैवेध व उरुस व रात्री 9 वाजता रजनी गोल्ड प्रस्तुत पाश्चिम महाराष्ट्र- सुप्रसिद्ध आर्केस्ट्रा धमाका याचा मनोरंजनाचा कार्यक्रम सिध्देश्वर मंदिराजवळ होणार आहे. तरी सर्व भक्त-भाविकांनी शांततेने देव-दर्शनाचा लाभ घेऊन मनोरंजनाचा आनंद लुटावा असे आवाहून उरुस कमिटीच्या मुख्य संयोजिका सौ. सुग्राबी उस्मान बिकट यांनी केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा