पंतप्रधान आयुष्मान भारत महाराष्ट्र मिशन समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे ६ एप्रिल रोजी सावंतवाडी येथे होणाऱ्या डिजिटल मिडिया संघटनेच्या महाअधिवेशनात सहभागी होणार

 पंतप्रधान आयुष्मान भारत महाराष्ट्र मिशन समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे ६ एप्रिल रोजी सावंतवाडी येथे होणाऱ्या डिजिटल मिडिया संघटनेच्या महाअधिवेशनात सहभागी होणार



मुंबई, दि.: डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रच्या सावंतवाडी येथे ६ एप्रिल २०२५ रोजी भोसले नॉलेज सिटी संकुलात होत असलेल्या तिसऱ्या महाअधिवेशनाचे निमंत्रण पंतप्रधान आयुष्मान भारत महाराष्ट्र मिशन समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे सहभागी होणार आहेत.संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने व उपाध्यक्ष सतीशभाऊ सावंत यांनी डॉ. ओमप्रकाश शेटे यांना नुकतेच भेट घेऊन निमंत्रण दिले.

संघटनेचे निमंत्रण डॉ.शेटे यांनी स्वीकारले तसेच पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्य विषयक प्रश्नांमध्ये योग्य ती मदत करण्याची भावना व्यक्त केली. यावेळी पंतप्रधान आयुष्मान भारत मिशनच्या देशांत आणि महाराष्ट्रात चाललेल्या वाटचालीची त्यांनी दिली.राजा माने यांनी राज्यातील डिजिटल पत्रकारांच्या अडचणी व संघटनेच्या आजवरच्या वाटचालीबद्दल डॉ. ओमप्रकाश शेटे यांना माहिती दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंडगरवाडी येथिल बंधाऱ्यामध्ये अनोळखी पुरुष जातीचे मयत सापडले

जिल्ह्यातील गट सचिवांना दीपावलीला तीन महिन्याचा पगार बोनस म्हणून द्यावा.

गोरगरीब जनतेसाठी सर्वतोपरी मदतीसाठी धाऊन जाणारा एखतपुर गावचा अवलिया पै.पंकज (Boss) चव्हाण