आमदार डॅा. बाबासाहेब देशमुख यांच्या मागणीला यश टेंभू, म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू

 आमदार डॅा. बाबासाहेब देशमुख यांच्या मागणीला यश टेंभू, म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू 



टेंभू, म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू करून माण व कोरडा नदीवरील बंधारे भरून देण्याची मागणी काही दिवसांपूर्वी आमदार डॅा. बाबासाहेब देशमुख यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री मा. राधाकृष्ण  विखे-पाटील यांच्याकडे तसेच पुणे येथे झालेल्या कालवा सल्लागार समिती च्या बैठकीत आक्रमक पणे केलेली होती. आ.डॅा. बाबासाहेब देशमुख यांनी केलेल्या मागणीला यश आले असून टेंभू, म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू झाले असून मायबाप शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांना जीवदान मिळणार आहे. टेंभू योजनेचे पाणी बुद्धेहाळ तलावात सोडून पूर्ण क्षमतेने भरून घेण्यात येणार आहे. त्यानंतर टेंभूचे पाणी माण नदीत सोडून बलवडी ते मेथवडे पर्यंतचे सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरून देण्यात येणार आहेत. तसेच टेंभू प्रकल्पाच्या पाण्याचे आवर्तन मिळाल्याने जनावरांच्या पाण्याचा व चाऱ्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. 

टेंभू व म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू झाल्याने शेतकरी वर्गात सध्या आनंदाचे व उत्साहाचे वातावरण असून लोकप्रिय आ.डॅा. बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नातून आवर्तन सुरू झाल्याने शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंडगरवाडी येथिल बंधाऱ्यामध्ये अनोळखी पुरुष जातीचे मयत सापडले

जिल्ह्यातील गट सचिवांना दीपावलीला तीन महिन्याचा पगार बोनस म्हणून द्यावा.

गोरगरीब जनतेसाठी सर्वतोपरी मदतीसाठी धाऊन जाणारा एखतपुर गावचा अवलिया पै.पंकज (Boss) चव्हाण