लक्ष्मीनगर गावाच्या यशात अजून एक मानाचा तुरा. संदीप गोडसे डॉक्टर म्हणून यशस्वी झाला.
लक्ष्मीनगर गावाच्या यशात अजून एक मानाचा तुरा. संदीप गोडसे डॉक्टर म्हणून यशस्वी झाला.
➖सर्वांना कळविण्यास आनंद होत आहे. लक्ष्मीनगर गावाच्या यशात अजून एक मानाचा तुरा.
➖ संदीप गोडसे डॉक्टर म्हणून यशस्वी झाला. 05 वर्षे 6 महिन्याचा डिग्री पूर्ण करून अखेर संदीप शिवाजी गोडसे आपल्या गावातील मुलगा Dr. संदीप गोडसे अशी पदवी घेऊन यशस्वी झाला. पदवी कार्यक्रम जयसिंगपूर - कोल्हापूर येथे पार पडला.पदवी कार्यक्रमास सर्व कुटुंब व मित्र परिवार हजर होते .सर्व सोहळा पाहून आनंद झाला.
➖ संदीप Dr. संदीप शिवाजी गोडसे असे गौरवपूर्ण पदवी सह यशस्वी झाला.सोहळा पूर्ण होतच पदवीधर 05 डॉक्टरांना भाषण संधी होती.त्यात यशस्वी विध्यार्थी म्हणून संदीप ला ही भाषणाचा संधी मिळाली. संदीप ने सुंदर भाषण केले.आपल्या डॉक्टरच्या भाषणाला प्रत्येक वाक्याला टाळ्या पडल्या.अंगावर काटा आला.डोळे पाणावले.माझ्या आई -वडिलांनी उस तोडी करुंन ,कष्ट करून शिक्षण केले.म्हणून आज डॉक्टर आहे.असे सुंदर भाषण करून डॉक्टरांनी आई - वडिलांन बाबत कृतज्ञता व्यक्त केली. छान वाटलं .आपली मूल आपल्या मातीचा ,आपल्या गावाचा व गोडसे परिवाराचा अभिमान वाढवत आहे.असेच सर्व मुलांनी कष्ट घेऊन यशस्वी व्हावे ही गावातील अधिकारी वर्गातून व मित्र मंडळीकडून आशा व्यक्त होत आहे.
➖संदीप चे शालीय शिक्षण :-
पहिली ते चौथी :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लक्ष्मी नगर
पाचवी ते दहावी :- माध्यमिक विद्यालय लक्ष्मी नगर
अकरावी व बारावी :- आबासाहेब खेबुडकर जुनियर कॉलेज ऑफ सायन्स आटपाडी
वैद्यकीय शिक्षण (BHMS) : - Dr. j.j. Magdum Homeopathy Medical College jaisinghpur.
डॉक्टर जे जे मगदुम होमिओपॅथी मेडिकल कॉलेज जयसिंगपूर येथून शिक्षण घेऊन यशस्वी झालेला आहे.
➖ Dr. संदीप चे आपण सर्वजन अभिनंदन करूया.त्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊया.आपणाला खात्री आहे तो,नक्कीच चांगली सेवा करून आपले कर्तव्या करेल. यशस्वी विध्यार्थी यास लक्ष्मी नगर गावातून शुभेच्छा वर्षाव होत आहे. संदीप चे शैक्षणिक संघर्ष हा गावातील तरुण पिडीस प्रेरणा देणारा आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा