सोलापूर जिल्ह्याला घरकुल चा कोटा वाढून मिळावा- खासदार धैर्यशील मोहिते पाटील.

 सोलापूर जिल्ह्याला घरकुल चा कोटा वाढून मिळावा- खासदार धैर्यशील मोहिते पाटील.



 प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) २०२४-२५ अंतर्गत माढा लोकसभा मतदारसंघातील गरीब व गरजू कुटुंबांसाठी सोलापूर जिल्ह्याला घरकुलांचा कोटा वाढवून मिळावा, यासाठी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या ग्रामीण गृहनिर्माण विभागाचे उपमहानिदेशक श्री गया प्रसाद यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.


यावेळेस खासदार मा.धैर्यशील मोहिते-पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात अद्यापही मोठ्या प्रमाणात गरीब, वंचित व शेतकरी कुटुंबांना घराची आवश्यकता असल्याचे अधोरेखित केले. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेतून अधिक घरकुले मंजूर करून कोटा वाढविण्याची विनंती त्यांनी केंद्र सरकारकडे केली.


यामुळे माढा मतदारसंघ व सोलापूर जिल्ह्यातील हजारो गरजू कुटुंबांना कायमस्वरूपी निवास उपलब्ध होईल आणि त्यांचा जीवनमान उंचावण्यास मोठा हातभार लागेल, असे खासदार मोहिते-पाटील पाटील यांनी व्यक्त केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंडगरवाडी येथिल बंधाऱ्यामध्ये अनोळखी पुरुष जातीचे मयत सापडले

जिल्ह्यातील गट सचिवांना दीपावलीला तीन महिन्याचा पगार बोनस म्हणून द्यावा.

गोरगरीब जनतेसाठी सर्वतोपरी मदतीसाठी धाऊन जाणारा एखतपुर गावचा अवलिया पै.पंकज (Boss) चव्हाण