महूद ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक शिंदे यांच्या मनमानी कारभाराविरोधात लहुजी पॅंथर सेना आक्रमक.!

 महूद ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक शिंदे यांच्या मनमानी कारभाराविरोधात लहुजी पॅंथर सेना आक्रमक.!




 दलित समाजातील असल्याने अविनाश कांबळे या तरुणाला दिली अपमानास्पद वागणूक..




सांगोला / तालुका प्रतिनिधी


महूद येथील रहिवासी असणारे अविनाश महादेव कांबळे यांनी महुद ग्रामपंचायतच्या कामकाजाविषयी तेथील ग्रामसेवक श्री शिंदे यांना दि.१८ मार्च २०२५ रोजी कांबळे यांनी महूद ग्रामपंचायत सन- २०२२-२३-२४ या तीन वर्षाचा लेखापारीक्षण अहवाल (ऑडिट) रिपोर्ट मिळणे बाबत ग्रामसेवक यांना अर्जाद्वारे विनंती केली होती. त्यावेळी ग्रामसेवक श्री. शिंदे यांनी २ दिवसात माहिती देतो अर्जाची गरज नाही असे सांगितले तरीही अविनाश कांबळे यांनी अर्ज केला त्यांची पोहोच त्यांना दिली. त्यानंतर वारंवार त्यांना विचारणा केली असता आज उ‌द्या देतो म्हणून श्री. शिंदे यांनी टाळाटाळ केली.



  ग्रामपंचायत कामकाजाची माहिती मिळणे हा त्यांचा अधिकार असताना त्यांना मागासवर्गीय समाजातील असल्याने जाणीवपूर्वक जातीयवादी मानसिकता ठेवून अधिकारापासून श्री. शिंदे यांनी जाणीवपूर्वक वंचित ठेवले आहे व अविनाश कांबळे यांना ते दलित समाजातील असल्यानेच त्यांना जाणीवपूर्वक अपमानास्पद वागणूक दिली. तसेच अविनाश कांबळे हे महूद येथील नागरिक असल्याने त्यांना ग्रामपंचायत च्या कारभाराविषयी माहिती मागण्याचा अधिकार असून त्यांच्या अधिकारावर गदा आणण्याचा प्रकार केल्याने ग्रामसेवक शिंदे यांच्या मुजोर आणि मनमानी कारभाराच्या विरोधात उद्या सोमवार दिनांक २ जून रोजी सांगोला पंचायत समिती समोर अविनाश कांबळे (शाखाप्रमुख. लहुजी पँथर सेना) हे अमरण उपोषण करणार असून दलित समाजाविषयी अशी अन्यायाची मानसिकता बाळगणाऱ्या सडक्या मेंदूंच्या ग्रामसेवक शिंदे यांना तात्काळ बडतर्फ करावे व त्यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी अविनाश महादेव कांबळे हे अमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंडगरवाडी येथिल बंधाऱ्यामध्ये अनोळखी पुरुष जातीचे मयत सापडले

जिल्ह्यातील गट सचिवांना दीपावलीला तीन महिन्याचा पगार बोनस म्हणून द्यावा.

गोरगरीब जनतेसाठी सर्वतोपरी मदतीसाठी धाऊन जाणारा एखतपुर गावचा अवलिया पै.पंकज (Boss) चव्हाण