सांगोला; सोनंद-गळवेवाडी रस्त्यावरील अपघातात, बहिण भाऊ ठार.
सांगोला; सोनंद-गळवेवाडी रस्त्यावरील अपघातात, बहिण भाऊ ठार.
सांगोला प्रतिनिधी
सांगोला तालुक्यातील सोनंद ते गळवेवाडी रस्त्यावर शेख वस्ती येथे ट्रक आणि दुचाकी अपघातात सख्खे चुलत बहिण भाऊ ठार झाल्याची घटना दि.१६ जून रोजी साडेचार वाजण्याच्या सुमारास सोनंद- गळेवाडी रस्त्यावर घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, पल्लवी चंद्रकांत गळवे वय-१८ रा.गळवेवाडी, सोनंद, ता. सांगोला चुलत भाऊ गुरुप्रसाद रमेश गळवे (वय-१३) यास शाळा सुटल्यानंतर मोटर सायकल (एम एच.४५ एच. ४४२६) वरून घरी घेऊन जात होती. त्यावेळी ट्रक (के ए ११-४०८४) च्या चालकाने धडक दिल्याने ट्रकचे चाक अंगावरून गेल्याने दोघेही जागीच ठार झाले. गुरूप्रसाद हा सोनंद येथील शाळेत आठवीत शिकत होता.
16 जून हा शाळेचा पहिला दिवस होता. त्याची शाळा लवकर सुटल्याने त्यास त्याची बहिण गावाकडे घेऊन जात होती. याबाबत रमेश म्हातारबा गळवे यांनी सांगोला पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शाळेचा पहिला दिवस असताना हि दुर्दैवी अपघाती घटना घडल्यामुळे गळेवाडी गावामधील अनेक नागरिकांना अश्रू अनावर झाले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा