आम.डॉ.बाबासाहेब देशमुख नागरिकांच्या प्रश्नांवर आक्रमकनगरपरिषदेविषयी नागरिकांच्या वाढत्या तक्रारी; आ.बाबासाहेब देशमुख यांनी अधिकार्‍यांना घेतले फैलावर

 आम.डॉ.बाबासाहेब देशमुख नागरिकांच्या प्रश्नांवर आक्रमकनगरपरिषदेविषयी नागरिकांच्या वाढत्या तक्रारी; आ.बाबासाहेब देशमुख यांनी अधिकार्‍यांना घेतले फैलावर



सांगोला(तालुका प्रतिनिधी):- 

नगरपालिकेच्या कामकाजाविषयी नागरिकांमधून नाराजीचा सूर मोठ्या प्रमाणात सुरु आहे. आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी दि.20 जून (शुक्रवार ) सकाळी 7.45 वाजण्याच्या सुमारास नगरपालिकेत बैठक आयोजीत करुन प्रत्यक्ष अधिकार्‍यांशी चर्चा करत कामकाजात सुधारणा करण्याच्या सूचना केल्या. एकूणच शहरातील विकासकामे, विविध भागातील रस्ते, भुयारी गटार, पाणीपुरवठा, घनकचरा, लाईट, जन्म मृत्यूचे दाखले, या विषयावर आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी अधिकार्‍यांना चांगलेच फैलावर घेतल्याने नगरपरिषदेच्या अधिकार्‍यांची चांगलीच कोंडी केली. 

आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी नगरपरिषदेत आढावा बैठक आयोजीत केली होती. बैठकीप्रसंगी मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांच्यासह सर्व विभागप्रमुख, अभियंते, सांगोला सिव्हील इंजि.असोसिएनचे पदाधिकारी उपस्थित होते.आमदार झाल्यानंतर डॉ.बाबासाहेब देशमुख हे प्रथमच नगरपरिषदेत गेले होते. मुख्याधिकारी यांच्या दालनात बैठक संपन्न झाली. आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी सर्व विभागाचा सविस्तर आढावा जाणून घेतला.

सांगोला शहर व परिसरातील रस्त्याची दुरावस्था, डिजीटल बोर्ड, स्वच्छतेचे अनेक प्रश्न, गुंठेवारीचे अनेक प्रश्न यावर अनेक प्रश्न उपस्थित करुन आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले. त्याचा रोष पाहून उपस्थित सर्वजण आवक झाले. यानंतर तरी नगरपरिषदेच्या कामकाजात योग्य ती सुधारणा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या बैठकीप्रसंगी नागरिकांना सक्षम व दर्जेदार सुविधा मिळाल्या पाहिजेत, विकासकामे करताना कुठेही भेदभाव करू नये, सर्वांना समान न्याय द्यावा, अधिकार्‍यांनी कुणाच्याही दबावाखाली काम करू नये, असे प्रकार सहन केले जाणार नाहीत, गेल्या तीन ते चार वर्षापासून नागरिकांच्या कामांकडे दुर्लक्ष होत असल्याचे तक्रारी नागरिकांकडून होत आहेत. नागरिकांची सर्व प्रकारची कामे तातडीने मार्गी लागली पाहिजेत असे सांगत नागरिकांच्या समस्यांकडे, प्रश्नांकडे दुर्लक्ष करु नये अशा सूचना आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी अधिकार्‍यांना केल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंडगरवाडी येथिल बंधाऱ्यामध्ये अनोळखी पुरुष जातीचे मयत सापडले

जिल्ह्यातील गट सचिवांना दीपावलीला तीन महिन्याचा पगार बोनस म्हणून द्यावा.

गोरगरीब जनतेसाठी सर्वतोपरी मदतीसाठी धाऊन जाणारा एखतपुर गावचा अवलिया पै.पंकज (Boss) चव्हाण