डिजिटल मीडियाला मिळाली अखेर राजमान्यता, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महायुती सरकारचे सांगोला तालुका अध्यक्ष रविंद्र कांबळे यांनी मानले आभार.

 डिजिटल मीडियाला मिळाली अखेर राजमान्यता, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महायुती सरकारचे सांगोला तालुका अध्यक्ष रविंद्र कांबळे यांनी मानले आभार. 



सांगोला /प्रतिनिधी 


राज्य शासनाने महाराष्ट्रातील डिजिटल मीडिया मधील काम करणाऱ्या संपादक पत्रकारांसाठी मोठा निर्णय घेतला असून डिजिटल मीडियामधील चॅनल्स व वेब पोर्टल्स ना आता राजमान्यता दिली आहे.त्यांना जाहिरात देण्याबाबत चे परिपत्रक अधिकृतरित्या जाहीर केले आहे. गेले अनेक दिवसापासून ही मागणी पत्रकारांनी, अनेक पत्रकारांच्या संघटनांनी केली होती त्या मागणीला यश आले आहे. 

       डिजिटल मीडियाला अखेर राजमान्यता दिल्यामुळे महायुतीच्या सर्व नेत्यांचे व सरकारचे सांगोला तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रवींद्र कांबळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे आभार मानले व 

अभिनंदन केले आहे. या निर्णयाचा महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना मोठा लाभ मिळणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंडगरवाडी येथिल बंधाऱ्यामध्ये अनोळखी पुरुष जातीचे मयत सापडले

जिल्ह्यातील गट सचिवांना दीपावलीला तीन महिन्याचा पगार बोनस म्हणून द्यावा.

गोरगरीब जनतेसाठी सर्वतोपरी मदतीसाठी धाऊन जाणारा एखतपुर गावचा अवलिया पै.पंकज (Boss) चव्हाण