सांगोला तालुक्यासाठी नवीन एम.आय. डी.सी.मंजूर करणार - उद्योगमंत्री नाम.उदय सामंत यांचे आश्वासन

 सांगोला तालुक्यासाठी नवीन एम.आय. डी.सी.मंजूर करणार - उद्योगमंत्री नाम.उदय सामंत यांचे आश्वासन




माजी आमदार ॲड.शहाजीबापू पाटील यांच्या मागणीस यश

सांगोला/प्रतिनिधी :- सांगोला तालुक्याचे माजी आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांनी सांगोला तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी नवीन भव्य एम. आय. डी. सी .उभारावी अशी मागणी उद्योगमंत्री नाम.उदय सामंत यांची भेट घेऊन केली . सांगोला तालुक्यातील तरुणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नवीन एम. आय. डी. सी .मंजूर करण्याचे आश्वासन माजी आम. अँड. शहाजीबापू पाटील यांना दिले आहे. नवीन एम.आय.डी.सी मुळे तालुक्याचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होणार आहे. आमदार ॲड.शहाजीबापू पाटील यांनी केलेल्या मागणीला मोठे यश आले आहे. भविष्यात उद्योग व्यवसाय वाढल्याने तालुक्यात क्रांती होईलअशी माहिती सांगोला तालुक्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या भेटीप्रसंगी उद्योगपती अभिजीत नलवडे ,योगेश खटकाळे, विशाल खटकाळे हे मान्यवर उपस्थित होते.

माजी आम.ॲड. शहाजीबापू पाटील यांच्या मागणीला व पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. नवीन एम .आय. डी. सी. निर्मितीमुळे भविष्यात तालुक्यात उद्योगाचे जाळे निर्माण होवून तालुक्याची अर्थव्यवस्था बळकट होईल . तरुणांना नोकरी मिळेल. त्यामुळे सांगोला तालुक्याचा व्यापारीदृष्टया विकास होईल व तालुक्याच्या विकासास चालना मिळेल. व्यापारी व औद्योगिकदृष्ट्या तालुक्याचा कायापालट होणार आहे अशी माहिती माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंडगरवाडी येथिल बंधाऱ्यामध्ये अनोळखी पुरुष जातीचे मयत सापडले

जिल्ह्यातील गट सचिवांना दीपावलीला तीन महिन्याचा पगार बोनस म्हणून द्यावा.

गोरगरीब जनतेसाठी सर्वतोपरी मदतीसाठी धाऊन जाणारा एखतपुर गावचा अवलिया पै.पंकज (Boss) चव्हाण