सांगोला ट्रॉमा सेंटर तात्काळ सुरू करा खा.धैर्यशील मोहिते पाटील यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी.

  सांगोला ट्रॉमा सेंटर तात्काळ सुरू करा खा.धैर्यशील मोहिते पाटील यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी. 




(प्रतिनिधी) - सांगोला, येथे बांधकाम पूर्ण झालेल्या ट्रॉमा सेंटरमध्ये अत्यावश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करून देऊन व कर्मचारी भरती करून हे केंद्र तात्काळ सुरू करावे,याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेत खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी मागणी केली


सांगोला येथे उभारण्यात आलेल्या ट्रॉमा सेंटरची इमारत सुसज्ज असूनही अद्याप ते कार्यान्वित करण्यात आलेले नाही. आवश्यक यंत्रसामग्री, डॉक्टर, नर्सिंग स्टाफ आणि इतर तांत्रिक कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे हे महत्त्वाचे ट्रॉमा निष्क्रिय स्थितीत आहे.


सांगोला तालुक्यातून नागपूर-रत्नागिरी आणि इंदापूर-जत हे दोन प्रमुख महामार्ग जात असल्यामुळे या भागातील वाहतूक प्रचंड आहे. परिणामी, अपघातांची संख्या वाढण्याची शक्यता कायम असते. अपघातग्रस्त रुग्णांना वेळेत उपचार मिळणे अत्यंत आवश्यक असून, हे ट्रॉमा सेंटर नागरिकांसाठी जीवनदायी ठरू शकते.


सध्या अपघातग्रस्त रुग्णांना सोलापूर, पंढरपूर, मिरज, येथे हलवावे लागते, ज्यामुळे वेळेवर उपचार मिळत नाहीत आणि जीवितहानी होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे बांधकाम पूर्ण झालेले सांगोला ट्रॉमा सेंटर तातडीने कार्यान्वित करून परिसरातील नागरिकांना आधुनिक आणि तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी आग्रही मागणी खासदार मोहिते पाटील यांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंडगरवाडी येथिल बंधाऱ्यामध्ये अनोळखी पुरुष जातीचे मयत सापडले

जिल्ह्यातील गट सचिवांना दीपावलीला तीन महिन्याचा पगार बोनस म्हणून द्यावा.

गोरगरीब जनतेसाठी सर्वतोपरी मदतीसाठी धाऊन जाणारा एखतपुर गावचा अवलिया पै.पंकज (Boss) चव्हाण