दिशा हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना सुरू - डॉ. सचिन गवळी

 दिशा हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना सुरू - डॉ. सचिन गवळी.



सांगोला ( प्रतिनिधी )- सांगोला शहरातील कडलास नाका येथील दिशा हॉस्पिटलमध्ये आयुष्यमान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना सुरू झाली असून याचा लाभ गरजू रुग्णांनी  घ्यावा असे आवाहन डॉ. सचिन गवळी यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाची ही एक आरोग्य योजना आहे, जी राज्यातील सर्व कुटुंबांना परवडणाऱ्या आरोग्य सेवा पुरवते. या योजनेत, प्रति कुटुंब प्रति वर्षी 5 लाख आरोग्य संरक्षण, तसेच महाराष्ट्र शासनाच्या आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत  5 लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण मिळते. ही योजना सर्वसमावेशक असून, विविध प्रकारच्या आजारांवर उपचार, शस्त्रक्रिया आणि आवश्यक वैद्यकीय सेवा यांमध्ये मदत करते. 

       यावेळी डॉ. सचिन गवळी यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, सांगोला येथील दिशा हॉस्पिटलमध्ये पूर्वीपासूनच मुख्यमंत्री साह्यता निधी योजना सुरू असून या  योजनेअंतर्गत सांधा रोपण शस्त्रक्रिया साठी निधी, सर्व मेडिक्लेम कॅशलेस सुविधा असून या हॉस्पिटल मध्ये सर्व प्रकारच्या फॅक्चर, अॅक्सिडेंट आणि ट्रॉमा केअर,

आर्थोस्कोपी (खांदा, गुडघा निसटणे उपचार) प्लास्टिक सर्जरी, कृत्रिम सांधारोपण शस्त्रक्रिया (T.H.R.,T.K.R.) स्पइन सर्जरी, जबड्याची शस्त्रक्रिया, मणक्याचे सर्व आजाराचे निदान व उपचार केले जातात असेही सांगितले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंडगरवाडी येथिल बंधाऱ्यामध्ये अनोळखी पुरुष जातीचे मयत सापडले

जिल्ह्यातील गट सचिवांना दीपावलीला तीन महिन्याचा पगार बोनस म्हणून द्यावा.

गोरगरीब जनतेसाठी सर्वतोपरी मदतीसाठी धाऊन जाणारा एखतपुर गावचा अवलिया पै.पंकज (Boss) चव्हाण