ब्रेकिंग न्यूज ; सांगोला तालुक्यातील76 ग्रामपंचायतीची सोडत 15 - 7- 2025 रोजी होणार - सांगोला तहसीलदार संतोष कनसे.

 ब्रेकिंग न्यूज ; सांगोला तालुक्यातील76 ग्रामपंचायतीची  सोडत 15 - 7- 2025 रोजी होणार - सांगोला तहसीलदार संतोष कनसे.



 सांगोला प्रतिनिधी 

गावोगावच्या नागरीकांना विशेषता सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना व नेत्यांना  उच्छुकता लागुन राहीलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांच्या  सोडतीची तारीख जाहीर.


सांगोला तालुक्यातील  ७६  ग्रामपंचायतीच्या २०२५ ते २०३० या पंचवार्षिक कालावधीसाठी सरपंच  पदांचे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम  मंगळवार दि.१५ -०७ -२०२५ रोजी दुपारी १२ :०० वाजता  आयोजन सांगोला तालुक्याचे तहसीलदार संतोष कणसे यांनी केले आहे 

   सदर आरक्षण सोडतीचा कार्यक्रम मा.तहसिलदार साहेब सांगोला यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यश्लोक  राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृतीभवन सांगोला येथे आयोजित केलेला आहे.

सदर आरक्षण सोडती बाबतचे माहीती पत्रक स्वता:  मा.तहसिलदार संतोष कणसे यांच्या सहिने प्रसिध्द करण्यात आले आसुन..

  मंगळवारी होणाऱ्या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागुन राहीले आहे

    आज तरी गावोगावी आपल्या गावात कोणते आरक्षण पडेल यावरती चर्चा व आंदाज बांधले जात आहेत.काही कार्यकर्ते आपल्या गावात  सर्वसाधारण आरक्षण पडेल .तर काही जण  म्हणतात सर्वसाधारण पडेल परंतु महिलेसाठी  आरक्षण पडेल ..काही कार्यकर्ते व नागरीक आपल्या गावात  ओबीसी आरक्षण  पडेल तर काही जण  म्हणतात ओबीसी महीला आसे आरक्षण पडेल.. काहींचे म्हणने आहे ही आहे की गावात  एस.सी पुरुष आरक्षण पडेल तर काही म्हणतात एस.सी आरक्षण पडेल परंतु महिलेसाठी आरक्षण पडेल. काहींचे अंदाज आसे आहेत या हुन वेगळेच आरक्षण पडेल. आशा रीतीने आरक्षणावर चोखंदळपणे गावोगावच्या    टपऱ्यांवर, चौंका-चौंकात  सार्वजनीक ठिकाणी चर्चा पहावयास मिळताना‌ दिसते.  त्यांच्या या वेगवेगळ्या चर्चा व आंदाजावरती  मंगळवारी उत्तर मिळणार असल्याने गावोगावी उस्तुकता शिगेला पोहचली आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंडगरवाडी येथिल बंधाऱ्यामध्ये अनोळखी पुरुष जातीचे मयत सापडले

जिल्ह्यातील गट सचिवांना दीपावलीला तीन महिन्याचा पगार बोनस म्हणून द्यावा.

गोरगरीब जनतेसाठी सर्वतोपरी मदतीसाठी धाऊन जाणारा एखतपुर गावचा अवलिया पै.पंकज (Boss) चव्हाण