अवैध वाहतूकीकडे जाणूनबूजून दुर्लक्ष रुग्ण हक्क संघर्ष समिती पुणे चा आंदोलनाचा इशारा
अवैध वाहतूकीकडे जाणूनबूजून दुर्लक्ष रुग्ण हक्क संघर्ष समिती पुणे चा आंदोलनाचा इशारा.
पुणे दि.02/07/2025 पुणे विभागीय परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड मॅडम यांना रुग्ण हक्क संघर्ष समिती महाराष्ट्र पुणे च्या वतीने अवैध वाहतूक व बिगर नोंदनी वाहने विक्री व हस्तांतरित करण्यात येत असले कारणाने नवीन वाहण विक्री करण्यात येणाऱ्या डिलरची कसून चौकशी करून तात्काळ कारवाई करण्यात यावी वाहन जप्त करून संबंधित डिलरचा परवाना कायम रद्द करण्यात यावे यासाठी निवेदन देण्यात आले.
मागील पोर्शे प्रकरणातून परिवहन अधिकारी यांना काही समज आली नाही असे दिसते. पुणे शहर. व जिल्हाभरात अनेक नवीन वाहन विक्रेते डिलर बिनधास्तपणे नविन गाड्या या बगर नोंद व नंबर प्लेट न लावता वाढदिवस मुहूर्त हटटापोटी परिवहन विभागाने ठरवून दिलेले नियम व कायदा धाब्यावर बसवून डिलीव्हरी देत आहेत. अनेक वेळा हौशी मौजेपोटी रईस जादे सुसाट गाड्या घेऊन मिरवताना एखादी घटना घडल्यानंतर यांना जाग येते पण त्यात एखादा सामान्य नागरिकांना आपला जिव गमवावा लागतो. अपघातानंतर गाडीला नंबरप्लेट नसल्याने त्याचा शोध घेणे अवघड असते. सध्या पुणे शहर व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूकिचे प्रमाणही वाढले आहे त्यावर कडक कारवाई करावी व नवीन वाहन नोंदणी करण्यासाठी खोटे दस्तऐवज तयार करून जोडले जाते यातून अधिकारी एजंट यांचे फोफावते पण अपघातानंतर त्या संबंधित वाहणाचा नोंदणी वेळी जोडलेला खोटा पुरावा असल्याने आरोपी सापडत नाहीत. याला सर्वस्वी भृष्ट अधिकारी कारणीभूत आहेत अशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ही या वेळी करण्यात आली अनेक वेळा डिलर ग्राहकांच्या आग्रहास्तव अथवा डेमो टेस्टड्राईव्हसाठी नवीन बगर नोंदकेलेली वाहने वापरतात यांवर वेळीच कारवाई झाली नाही तर रुग्ण हक्क संघर्ष समिती पुणे च्या वतीने तिव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
यावेळी रुग्ण हक्क संघर्ष समिती महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष ॲड विजयभाऊ पंडित, प.महाराष्ट्र प्रमुख संजय बावळेकर, सल्लागार ॲड शेखर बामणे व इतर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा