श्री. शिवाजी दत्तात्रय ऐवळे यांच्या मुलाचा वाढदिव प्राचलित पद्धतीला फाटा देत जवळपास 225 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करून लक्ष्मीनगर येथे साजरा करण्यात आला.
श्री. शिवाजी दत्तात्रय ऐवळे यांच्या मुलाचा वाढदिव प्राचलित पद्धतीला फाटा देत जवळपास 225 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करून लक्ष्मीनगर येथे साजरा करण्यात आला.
लक्ष्मीनगर प्रतिनिधी
दि,31 ऑगस्ट ;>वाढदिवस साजरा करण्याच्या प्रचलित पद्धतीला फाटा देत आज लक्ष्मीनगर तालुका सांगोला येथे श्री. शिवाजी दत्तात्रय ऐवळे यांनी आपल्या तरुण मुलाचा वाढदिवस एका आगळ्यावेगळ्या उपक्रमाने साजरा केला आहे. त्यांचा एकमेव चि.गणेश शिवाजी ऐवळे याचा 23 वा. वाढदिवस आज लक्ष्मीनगर जिल्हा परिषद शाळेतील व लक्ष्मीनगर अंगणवाडीतील जवळजवळ २२५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटपाने साजरा करण्यात आला.
यावेळी लक्ष्मीनगरचे सरपंच, उपसरपंच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्षा सर्व सदस्य, पालक वर्ग आणि ग्रामस्थ उपस्थित होते. प्रशालेच्या वतीने चि. गणेश यांना शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. राजेंद्र नरळे यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ आणि मानाचा फेटा बांधून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी राजे ग्रुप गणेश तरुण मंडळ व स्वामी समर्थ जनरल स्टोअर्स लक्ष्मी नगर यांचे वतीने भविष्यात इयत्ता पहिली ते चौथी वर्गात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण शैक्षणिक साहित्य सह स्कूल बॅग भेट देणार असल्याचे श्री शिवाजी ऐवळे यांनी सांगितले. या आगळ्यावेगळ्या आणि आदर्शवत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सिद्धेश्वर हिप्परकर सर यांनी केले तर श्री. लक्ष्मण कुंभार सर यांनी मार्गदर्शन केले. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. संजय महाजन सर यांच्या उत्कृष्ट नियोजनाखाली सर्व शिक्षक वृंदांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा