महापुरुषांची जयंती ही नाचून नाही तर वाचून साजरी केली पाहिजे:- डॉ निकिताताई देशमुख.

 महापुरुषांची जयंती ही नाचून नाही तर वाचून साजरी केली पाहिजे:- डॉ निकिताताई देशमुख.


महूद येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी.

सांगोला / तालुका प्रतिनिधी

विश्वरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती महूद येथे विविध उपक्रमांने साजरी करण्यात आली यामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या श्री शिवाजी विद्यालय महूद येथे गरजू 105 विद्यार्थ्यांना डॉ.निकिताताई देशमुख यांच्या शुभहस्ते व म.फुले सूतगिरणीचे चेअरमन अभिजीत ढोबळे,पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शालेय साहित्य वाटप करण्यात आले व त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये महूद येथील स्मशानभूमीमध्ये 105 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.



     यावेळी व्यासपीठावरून बोलताना डॉ.निकिता ताई म्हणाल्या की लोकशाहीर अण्णाभाऊ यांनी तत्कालीन व्यवस्थेच्या अन्यायामुळे त्यांना फक्त दीड दिवसाचे शालेय शिक्षण मिळाले त्यावेळी त्यांनी मला शिक्षण जरी घेता आले नाही तरी मी माझ्या लिखाणाद्वारे समाज व्यवस्थेमध्ये बदल घडवून दाखवणार असा निश्चय बोलून दाखवला व तो सार्थ देखील केला त्यांचे जीवन आणि त्यांच्या जीवनातील संघर्ष हे नेहमीच समाजाला मार्गदर्शन देणारे राहिले अण्णाभाऊंनी लिहिलेल्या साहित्यामुळे त्यांचे नाव देशभरासह विदेशामध्ये देखील गाजले त्यांचा पूर्णाकृती पुतळा हा युरोपमध्ये असून परदेशात देखील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार व लेखणी यामधून आदर्श घेतले जाते त्यामुळे अशा महापुरुषांची जयंती नाचून नव्हे तर वाचून साजरी झाली पाहिजे असे सांगून लोकशाहीर अण्णाभाऊ हे पुरोगामी विचाराचे होते आणि तेच पुरोगामी विचार पुढे घेऊन सांगोला तालुक्याचे विद्यमान आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख वाटचाल करत असल्याचे यावेळी आपल्या मनोगतांमध्ये डॉ. निकिताताई देशमुख यांनी सांगितले व अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

      यावेळी व्यासपीठावर म. फुले सूतगिरणी चे चेअरमन अभिजीत ढोबळे, सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे,काँग्रेस तालुकाध्यक्ष अभिषेक कांबळे, श्री शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक पठाण सर,शिवसेना जिल्हा उपप्रमुख सूर्यकांत घाडगे,शेकाप नेते बाळासाहेब पाटील, स्कुल कमिटी सदस्य डॉ. खांडेकर, कैलास खबाले, ग्रामपंचायत सदस्य संजय चव्हाण, पत्रकार मिनाज खतीब, महेश वाघमारे हे उपस्थित होते.



     या कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळाचे मार्गदर्शक ऍड.अभिषेक कांबळे यांनी प्रास्ताविक करत असताना श्री शिवाजी विद्यालय आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना मदत व्हावी या हेतूने महूद येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळाकडून नेहमीच सहकार्याची भूमिका घेतली जाते यासह वृक्षारोपण करून त्या लावलेल्या झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी देखील आम्ही घेत असून पुढच्या वर्षी या लावलेल्या झाडांचे वाढदिवस साजरे करण्यासाठी मान्यवरांना बोलवणार असल्याचे अभिषेक कांबळे यांनी सांगितले तसेच या विद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना लवकरच अण्णाभाऊ यांनी लिहिलेल्या कादंबरी भेट देणार असून त्या कादंबरी वाचून विद्यार्थ्यांनी स्वतःचे आयुष्य घडवावे असे मत त्यांनी व्यक्त केले.

    यावेळी व्यासपीठावरून बोलताना सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे म्हणाले की रयत शिक्षण संस्थेच्या श्री शिवाजी विद्यालय येथील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप आणि वृक्षारोपण यासारखे आदर्श उपक्रम राबविल्याबद्दल जयंती उत्सव मंडळाचे अभिनंदन केले तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिवापर टाळावा मोबाईल मुळे विद्यार्थी हे शाळा आणि महाविद्यालयांमध्ये होणाऱ्या खो-खो कबड्डी यासारख्या खेळांपासून दूर जात असून याचे विचार पालकांना करण्याची वेळ आली आहे विद्यार्थी मैदानी खेळ जितके जास्त खेळतील तितके त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहील असा सल्ला यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

   याप्रसंगी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून समाज उपयोगी उपक्रम राबविल्याबद्दल उपस्थित मान्यवरांकडून जयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांचे कौतुक व्यक्त करण्यात आले.

    शेवटी उपस्थित मान्यवरांचे माजी विध्यार्थी प्रतिनिधी व उधोजक जितेंद्र बाजारे यांनी आभार व्यक्त केले.





१) चौकट:-


लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या विद्यार्थ्यांना भेट देणार ॲड.अभिषेक कांबळे यांचा संकल्प.!



विश्वरत्न, साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी देशालाच नव्हे तर जगाला आपल्या कादंबऱ्या आणि लिखाणाद्वारे दिशा देण्याचे काम केले अशा लोकशाहीरांचे विचार शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्यास त्यांचे आयुष्य घडण्यास नक्कीच मदत होईल या उद्देशाने अण्णाभाऊ यांच्या यांनी लिखाण केलेल्या सर्व कादंबऱ्या,साहित्य विद्यार्थ्यांना भेट म्हणून देणार असल्याचे संकल्प यावेळी व्यासपीठावरून ॲड.अभिषेक कांबळे यांनी केले.




२) चौकट..



 जाती-धर्मा पलीकडे जाऊन महापुरुषांचे विचार अंगीकारले पाहिजे:- पोलीस निरीक्षक विनोद घुगे.



लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळ महूद यांनी जयंतीचे औचित्य साधून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व वृक्षारोपण असे समाज उपयोगी उपक्रम राबवून जयंती साजरी केली याबद्दल त्यांचे अभिनंदन सर्वांनी अशाच प्रकारे महापुरुषांना जाती धर्मामध्ये न वाटून घेता हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महापुरुषांचे विचार अंगीकारून सर्व समावेशक असे उपक्रम राबविणे हे काळाची गरज आहे असे मत पोलीस निरीक्षक विनोदजी घुगे यांनी व्यक्त केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंडगरवाडी येथिल बंधाऱ्यामध्ये अनोळखी पुरुष जातीचे मयत सापडले

जिल्ह्यातील गट सचिवांना दीपावलीला तीन महिन्याचा पगार बोनस म्हणून द्यावा.

गोरगरीब जनतेसाठी सर्वतोपरी मदतीसाठी धाऊन जाणारा एखतपुर गावचा अवलिया पै.पंकज (Boss) चव्हाण