माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. धैर्यशिल मोहिते–पाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे कोल्हापूर–कलबुर्गी–कोल्हापूर (गाडी क्र. 01451 व 01452) ही विशेष रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे

 माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. धैर्यशिल मोहिते–पाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे कोल्हापूर–कलबुर्गी–कोल्हापूर (गाडी क्र. 01451 व 01452) ही विशेष रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे.

 या सेवेचा शुभारंभ (फ्लॅग ऑफ) सांगोला रेल्वे स्थानक येथे मा. खासदार यांच्या सौभाग्यवती सौ. शितलदेवी धैर्यशिल मोहिते–पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला.






कार्यक्रमाच्या प्रसंगी सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या सौभाग्यवती सौ. डॉ. निकिताताई देशमुख उपस्थित होत्या. यावेळी फ्लॅग ऑफ समारंभ, रेल्वे इंजिन पूजन व चालकांचा सत्कार करण्यात आला.




या कार्यक्रमाला रेल्वे प्रशासनाचे अधिकारी, सांगोला शहर व तालुक्यातील नागरिक, शहीद अशोक कामटे संघटनेचे पदाधिकारी तसेच विविध नेतेमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




या रेल्वे सेवेमुळे सांगोला तालुक्यासह परिसरातील नागरिकांना कोल्हापूर व कलबुर्गी या दोन्ही दिशांना प्रवासासाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंडगरवाडी येथिल बंधाऱ्यामध्ये अनोळखी पुरुष जातीचे मयत सापडले

जिल्ह्यातील गट सचिवांना दीपावलीला तीन महिन्याचा पगार बोनस म्हणून द्यावा.

गोरगरीब जनतेसाठी सर्वतोपरी मदतीसाठी धाऊन जाणारा एखतपुर गावचा अवलिया पै.पंकज (Boss) चव्हाण