जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत कडलास हायस्कूलचा बोलबाला ; प्रशालेच तीन विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेत धडक.

 जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत कडलास हायस्कूलचा बोलबाला ; प्रशालेच तीन विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेत धडक.



सांगोला / तालुका प्रतिनिधी 


गुणवत्ता पूर्ण शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या क्रीडा व कलागुणांना वाव देणारे प्रशाला म्हणून सांगोला तालुक्यातलौकिक असणाऱ्या कडलास हायस्कूल कडलास प्रशालेच्या तीन विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत घवघवीत यश संपादित करत विभागीय स्पर्धेत धडक दिली आहे प्रशालेच्या इयत्ता सहावीत शिकणाऱ्या धनश्री विकास गायकवाड इयत्ता सातवीतील यशराज दत्तात्रय गायकवाड व इयत्ता आठवीतील श्रुतिका विजयकुमार गव्हाणे या तिघांनी जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेत धडक मारली आहे. 


गुणवत्तापूर्ण खेळाडू निर्माण करणारी प्रशाला अशी ओळख असणाऱ्या कडलास हायस्कूल कडलास प्रशालेने आजवर सांगोला तालुक्यातून कबड्डी, खोखो, किक बॉक्सिंग तसेच अन्य क्रीडा प्रकारातून दर्जेदार खेळाडू निर्माण केले आहेत. यंदाही प्रशालीची तीच दैदीप्यमान परंपरा जोपासत प्रशालेच्या तीन विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत आपला डंका वाजवला आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल संस्थाध्यक्ष, संचालक मंडळ, मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांनी यशस्वी तिन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर जिल्हास्तरीय स्पर्धेत आपल्या क्रीडा कौशल्याचा ठसा उमटवणाऱ्या तिन्हीही विद्यार्थ्यांवर सर्वच स्तरातून कौतुकांचा वर्षाव होऊ लागला आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंडगरवाडी येथिल बंधाऱ्यामध्ये अनोळखी पुरुष जातीचे मयत सापडले

जिल्ह्यातील गट सचिवांना दीपावलीला तीन महिन्याचा पगार बोनस म्हणून द्यावा.

गोरगरीब जनतेसाठी सर्वतोपरी मदतीसाठी धाऊन जाणारा एखतपुर गावचा अवलिया पै.पंकज (Boss) चव्हाण