मनमानी डंपर चालकां विरोधात कठोर कारवाई करणे बाबत पुणे मानव अधिकार समितीचे सहाय्यक अधिकारी मॅडम यांना निवेदन.

मनमानी डंपर चालकां विरोधात कठोर कारवाई करणे बाबत पुणे मानव अधिकार समितीचे सहाय्यक अधिकारी मॅडम यांना निवेदन.

 गावाकडच्या बातम्या संपादक कैलास हिप्परकर
 
 बारामती प्रतिनिधी 

 दि.30 सप्टेंबर 2025 रोजी मा. पोलीस उपअधीक्षक श्री सुदर्शन राठोड साहेब यांचे सहाय्यक अधिकारी मॅडम यांना काल फलटण चौकात झालेल्या अपघाताबाबत निवेदन देण्यात आले 

 एका निष्पाप वृदधा चा बळी गेला. यासंदर्भात पुणे जिल्हा मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली भारत यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. 



 बेकादेशीर वाहतूक करणाऱ्या डंपर चालकावरती आपल्या अधिकाऱ्यांच्या अंतर्गत कारवाई व्हावी असे विनंतीपूर्वक निवेदन दिले. पुणे जिल्हा- मानव अधिकार संरक्षण समिती  नवी दिल्ली भारत 

बारामती शहरातील वारंवार होणाऱ्या  डंप्पर  अपघातात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना न्याय देण्यात यावा, आम्ही मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली पुणे जिल्हा संघटनेच्या वतीनेआपणास नम्रपणे निदर्शनास आणून देऊ इच्छितो की बारामती शहरातील काही महिन्यांपासून मनमानी डंपर चालक अवजड वाहने बेफिकीरपणे चालवत आहेत या डंपर चालकांची चौकशी करून यांच्या  विरोधात कठोर कारवाई करणे बाबत आपणास विनंती करण्यात येत आहे असे निवेदनात  उल्लेख करण्यात आला आहे

       गेली काही महिन्यांमध्ये एका वडिलांसोबत दोन -लहान मुलींना आपला जीव गमवावा लागला .याला कोण जबाबदार व यावर कायद्यांतर्गत काय कारवाई केली याबाबत माहिती हवी आहे.आणि काल फलटण चौकात एका निष्पाप‌ वृद्ध व्यक्तीला डंपरने चिरडले व त्यातच त्याचा मृत्यू झाला. डंपरल बंदी असताना ही ही बेकायदेशीर वाहतूक कोणाच्या वरदहस्ताने चालते असा प्रश्न स्थानिक जनता विचारत आहे. लोकं मध्ये प्रचंड संतापाची लाट आहे. या गोष्टींवर आपल्या अंतर्गत योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे 

एका निष्पाप वृदधा चा बळी गेला. यासंदर्भात पुणे जिल्हा मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली भारत यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी मानवाधिकार संरक्षण समिती जनसंपर्क अधिकारी महाराष्ट्र राज्य माननीय श्री जी. एम. भगत साहेब जिल्हा उपसचिव माननीय श्री .शिवाजीराव काकडे देशमुख साहेब , पुणे जिल्हा उपाध्यक्ष माननीय श्री. दिनेश तांबे साहेब पुणे जिल्हा सचिव माननीय श्री. सोमेश हेगडे साहेब तसेच पुणे जिल्हा जनसंपर्क अधिकारी श्री मती शिला पवार तालुका जनसंपर्क अधिकारी श्री. वाघमारे साहेब पोलिस मित्र संघटना उपाध्यक्ष धनाजी भोसले साहैब उपस्थित होते. 

            

                 

                               

                                



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंडगरवाडी येथिल बंधाऱ्यामध्ये अनोळखी पुरुष जातीचे मयत सापडले

जिल्ह्यातील गट सचिवांना दीपावलीला तीन महिन्याचा पगार बोनस म्हणून द्यावा.

गोरगरीब जनतेसाठी सर्वतोपरी मदतीसाठी धाऊन जाणारा एखतपुर गावचा अवलिया पै.पंकज (Boss) चव्हाण