शहरवासियांची निःस्वार्थीपणे जनसेवा करणार्‍या वैशाली सतिश सावंत यांना प्रभाग क्र. 2 मधून मतदारांनी बिनविरोध करा ः अ‍ॅड. पृथ्वीराज चव्हाण

 शहरवासियांची निःस्वार्थीपणे जनसेवा करणार्‍या वैशाली सतिश सावंत यांना प्रभाग क्र. 2 मधून मतदारांनी बिनविरोध करा ः अ‍ॅड. पृथ्वीराज चव्हाण 

गावाकडच्या बातम्या संपादक कैलास हिप्परकर मो ,98 81 47 27 91

सांगोला/प्रतिनिधी : 

सर्वसामान्यांची आहोरात्र कामे करून पक्ष, पार्टी विरहित सतिश सावंत यांनी शहरवासियांची निस्वार्थीपणे जनसेवा करून सांगोला शहराचा विकास चांगल्याप्रकारे करून शहरवासियांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रभाग क्र. 2 मधील मतदारांनी वैशाली सतिश सावंत यांना बिनविरोध निवडून द्यावे असे आवाहन आधुनिक सांगोल्याचे शिल्पकार, ज्येष्ठ विधीज्ञ व सांगोला नगरीचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष अ‍ॅड.पृथ्वीराजभाऊ चव्हाण यांनी केले. 

हल्लीच्या राजकीय वातावरणात पक्ष फोडाफोडी पक्षांतर व पक्ष बदलणे अशा प्रकारात वाढ होत चालली आहे. ही लोकशाहीच्या मूल्यांना धोका आहे. पक्ष-पार्टी, जात-पात विरहित शहराची निस्वार्थीपणे जनसेवा करणार्‍या उमेदवार सदस्यांची जनहिताच्या दृष्टीने शहराला आवश्यकता आहे. 2016 साली सांगोला नगरीचे संपादक मतदारांच्या जोरावर अपक्ष निवडणूक लढवून निवडून आले आहेत. त्यांनी सांगोला शहराची, नागरिकांची उत्तम प्रकारे जनसेवा केली आहे. आहोरात्र जनतेचे प्रश्‍न प्रामाणिपणे सोडविले आहेत. पूर्व भागाच्या विकासात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. याची प्रचिती व अनुभव मलाही आल्याचे अ‍ॅड. पृथ्वीराज चव्हाण (भाऊ) यांनी सांगून आता वयाच्या 93 व्या वर्षी धर्म, पक्ष-पात, पंत, भाषा या सर्वांच्या पलिकडे जाऊन निर्भय व जनकल्याण करणारे लोक पुढे यावेत असे मला विचारांती सतत वाटत आहे. प्रभाग क्र. 2 ब हे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे. यामध्ये वैशाली सतिश सावंत या निवडणुकीत कसोटीला उतरणार आहेत. सतिश सावंत हे 24 तास जनसेवा करीत आहेत. शहरवासियांचे प्रश्‍न पोटतिडकीने सोडवत आहेत. शहरवासियांच्या प्रश्‍नांची व शहराच्या विकासाची त्यांना जाण आहे. त्यामुळे प्रभाग क्र. 2 मधील मतदारांनी जनसेवा करणार्‍या उमेदवार वैशाली सतिश सावंत यांना बिनविरोध निवडून देवून इतिहास घडवावा. तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे कळवळ्याच्या जाती लाभे विन करती प्रीती हा अभंग त्यांनी खरा करून दाखविला आहे. आता या 93 व्या वर्षी मला या वयात सर्वच प्रश्‍न सारखेच आहेत. शहराचा भविष्यात चांगला विकास व्हावा शहरातील नागरिकांचे प्रश्‍न सोडवून त्यांना प्रभाग क्र. 2 मधील नागरिकांनी बिनविरोध निवडून द्यावे असे आवाहन अ‍ॅड. पृथ्वीराज चव्हाण यांनी करून निवडणुकीला शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंडगरवाडी येथिल बंधाऱ्यामध्ये अनोळखी पुरुष जातीचे मयत सापडले

जिल्ह्यातील गट सचिवांना दीपावलीला तीन महिन्याचा पगार बोनस म्हणून द्यावा.

गोरगरीब जनतेसाठी सर्वतोपरी मदतीसाठी धाऊन जाणारा एखतपुर गावचा अवलिया पै.पंकज (Boss) चव्हाण